माधुरी दीक्षितच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
माधुरी दीक्षितच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
महा घडामोडी न्युज नेटवर्क, मुंबई : स्टारकिड्सना प्लॅटफॉर्म पुरवण्यासाठी ओळखल्या जाणा-या करणने सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खान याला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम दिले आहे, आता बातम्या येत आहेत की माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन नेने आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान खान देखील यात सामील आहेत. करण जोहरने नुकतेच त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपट निर्मात्याने एक बीटीएस व्हीडीओ शेअर केला आहे.
स्टार किड्सची नवी बॅच बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम यांच्यापाठोपाठ आता माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराच्या मुलानेही पाऊल टाकल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, अरहान खान आणि अरिन नेने करण जोहरच्या आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.
करण जोहर ब-याच दिवसांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ‘ए दिल मुश्कील’चे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर आणि आलियाने यापूर्वी ‘गली बॉय’मध्ये एकत्र काम केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत