कोरपना नगरपंचायत मध्ये माहीती अधिकाराचा फज्जा ? माहीती न देणे हा गुन्हा ?
कोरपना नगरपंचायत मध्ये माहीती अधिकाराचा फज्जा ? माहीती न देणे हा गुन्हा ?
महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : केंद्र शासनाने माहिती अधिकार 2005 कलम 8 (त्र ) आवश्यक ती माहिती प्रसिद्ध उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे असे असताना कोरपणा नगरपंचायतीमध्ये अनेक योजनांची माहिती अधिकार अर्जानुसार मागितलेली माहिती उपलब्ध करून दिल्या जात नाही तत्कालीन मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळके यांनी अनेक नागरिकांनी मागितलेल्या माहिती संबंधाने अपील दाखल करूनही सुनावणी घेतली नाही.
अनेक वेळा सुनावणी ला बोलावून कामाचे कारण सांगून तारीख पे तारीख देण्याचं काम केलं मात्र कोरपणा नगरपंचायत मध्ये बांधकाम घनकचरा व्यवस्थापन वृक्ष लागवड यामध्ये अनेक गैरप्रकार घडले अनेक विकासाची कामे नियमबाह्य झाल्याच्या तक्रारी आहेत मात्र येथील मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती देण्याकडे दुर्लक्ष करीत माहिती अधिकाराचा फज्जा उडविला आहे अनेक माहिती पाप गैरव्यवहार लपवण्यासाठी देण्यात करिता टाळाटाळ व कसूर केल्या जात आहे या नगरपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा सावळा गोंधळ असून माहिती अधिकार अभिलेखांमध्ये नियमानुसार कारवाई केल्या जात नाही.
हे सर्रास उल्लंघन या ठिकाणी केल्या जात असून नगरपंचायतीचे माहिती अधिकारी कपिल नल्लेवार हे नियमाचे पालन न करता खाजगी आंगतूक हस्तक्षेप ही कारणे देऊन नगरपंचायतीचे पाप लपवण्याचे काम व कर्तव्य शुन्य बेजबाबदारी करीत असून सुनावणी न घेणे माहिती न देणे हा गुन्हा असून माहिती अधिकारी कायद्याने माहिती देण्याऐवजी हस्तक्षेपाच्या कारणावरून अर्ज नाकारण्याचा प्रकार निंदनीय असून बे जबाबदारपणाचा पुरावा आहे.
याबाबत अपील दाखल करण्यात आली असून माहिती आयोग व पोलीस विभागाकडे तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येतिल माहीती लपविण्याचे कारणावरूणराज्यात गुन्हा दाखल झाला याची जान ठेऊन नव्याने रुजू झालेल्या मुख्यधिकारी यांनी दखल घेऊन माहिती अधिकाराचा होत असलेला फज्जा थांबवावा अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत