कर्तव्यदक्ष तलाठी म्हणून राहुल श्रीरामवार,यांची जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित
कर्तव्यदक्ष तलाठी म्हणून राहुल श्रीरामवार,यांची जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रवीण चिडे, विरुर : विरुर स्टेशन साजातील कर्तव्यदक्ष तलाठी राहुल श्रीरामवार यांना सण 2021-2022 या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्या बध्दल त्यांना 1 आगस्ट ला महसूल दिनानिमित्य मा.जिल्हाधिकारी गुल्हाने साहेब चंद्रपूर यांचा हस्ते सन्मानित करून प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले तलाठी साहेब आपल्या साजातील शेतकऱ्यांना प्रत्येक कामात सहकार्य करतात शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या सोडवण्यात तत्पर असतात कुणालाही त्रास न देता त्यांना मदत करन्याचा प्रयत्न करताना पहावयास मिळत आहे त्यांचा प्रेमळ स्वभाव चेहऱ्यावर स्मित हास्य शांत संयमी असणारे तलाठी साहेबाना सोशल मीडिया द्वारे शुभेच्छाचा वर्षाव होताना पहावयास मिळत आहे.
तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.
दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल (हिन्दीत टोडरमल) नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पद निर्माण केले. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी (हिन्दीत पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली.
- ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
- शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
- नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे.
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
प्रत्येक गावी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या विशिष्ट नमुन्यांमध्ये तलाठी-दप्तर ठेवलेले असते. या नोंदवहीचे नमुने महसूल कायद्यामध्ये तयार करून देण्यात आले आहेत.
१ नमुना क्रमांक-१ या नमुन्यात वेगवेगळया धारणा प्रकारच्या खातेदारांकडून किती जमीन महसूल देय आहे, तसेच लागवडयोग्य क्षेत्र किती आहे याची नोंद असते.
२ नमुना क्रमांक-१चा गोषवारा या नमुन्यात भोगवटादार वर्ग-१ चे क्षेत्र, वर्ग-२ चेक्षेत्र, गावातील नदी, नाले, रस्ता, गायरान व स्मशानभूमी यांचे तपशील असतात.
३ नमुना क्रमांक-१अ यात वन म्हणून अधिसूचित करण्यात आलेले सर्व क्षेत्र कोणकोणत्या सर्वेक्षण क्रमांकामध्ये आहे त्याचा तपशील असतो.
४ नमुना क्रमांक-१ब यांत गावातील शासकीय जमिनींची माहिती व त्या जमिनीवरील सार्वजनिक अधिकार एकत्रितरीत्या दाखविले असतात.
५ नमुना क्रमांक-१क यात ज्या जमीनधारकांना पुनर्वसनासाठी नवीन शर्तीवर जमिनी मिळतात, अशा सर्व जमिनी व जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या जमिनींचे तपशील
६ नमुना क्रमांक-१ड यात जमीन अधिनियिम, १९६१ याच्या उपकलमांनुसार सीलिंग व इतर अतिरिक्त जमिनींची माहिती असते.
७ नमुना क्रमांक-१इ सरकारी अथवा सार्वजनिक जमिनींवर संबंधित अतिक्रमणाबाबत व आक्रमणावरील कारवाईबाबत माहिती
८ नमुना क्रमांक-२ सरकारी अथवा सार्वजनिक जमिनींवरील (सजामधील) बिनशेती जमीन धारणा व संबंधित महसुलाबाबत माहिती
९ नमुना क्रमांक-३ गावातील देवांच्या जमिनी व त्यांच्या करआकारणीमधून शासनाला मिळणारा महसूल
१० नमुना क्रमांक-४ विलंब शुल्कवसुली, गुरे चारण्याचे शुल्क, किंवा सरकारी जमिनीवरील काटेरी झुडपे तोडण्याचे शुल्क यांपासून मिळणाऱ्या महसुलाची माहिती
११ नमुना क्रमांक-५ क्षेत्र आणि महसूल याांचा सर्वसाधारण गोषवारा (ठरावबंद- तत्संबंधी खतावणी-जमाबांदी पत्रक)
१२ नमुना क्रमांक-६ फेरफारांची नोंदवही
१३ नमुना क्रमांक-६ अ विवादग्रस्त प्रकरणाांची नोंदवही
१४ नमुना क्रमांक-६ ब विलंब शुल्क प्रकरणाांची नोंदवही
१५ नमुना क्रमांक-६ क वारसा प्रकरणाांची नोंदवही
१६ नमुना क्रमांक-६ ड नवीन उपभार् (पोटहिस्से) नोंदवही
१७ नमुना क्रमांक-७ अधिकार अभिलेख पत्रक
१८ नमुना क्रमांक-७ अ कुळवहिवाट नोंदवही
१९ नमुना क्रमांक-७ ब अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्जात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्तींव्यतिरिकत इतर व्यक्तीची नोंद असणारी वही
२० नमुना क्रमांक-८ अ धारणा जमिनीची नोंदवही
२१ नमुना क्रमांक-८ ब येणे रकमा व वसुली यांची वर्गश: खातेवही व सर्व ठरावबंद बाबींच्या चाचणी ताळेबंदांची नोंदवही (असामीवार खतावणी व लावणी पत्रक)
२२ नमुना क्रमांक-८ क मागण्या व वसुली याांची वर्गश: खातेवही आणि जमीन महसुलाखेरीज इतर बाबी (उदा. बाांधबांहदस् ती ववर्यक येणे रकमाांव् यनतररक्त पाटबांधारे ववर्यक येणे रकमा, पोट-हहस् सा भूमापन फी, ववक्रीकर, आयकर इत यादी याांचा चाचणी ताळेबांद याांची नोंदवही (????? निरर्थक!!!)
२३ नमुना क्रमांक-८ ड शासकीय येणे रकमांची व इतर रोख रकमांची नोंदवही
२४ नमुना क्रमांक-९ दैनिक जमापुस्तक (ककदग व जमापुस्तक)(????? निरर्थक!)
२५ नमुना क्रमांक-९ अ जमीन महसुलाखेरीज इतर येणे रकमांच्या वसुलीसाठी जमापुस्तक (ककदग व जमापुस्तक)(??? निरर्थक!)
२६ नमुना क्रमांक-९ ब गाव नमुना नऊची पावती पुस्तके व इतर पावती पुस्तके यांच्या संग्रहाची नोंदवही
महाराष्ट्रातील तलाठी यांना अधिकार नसल्याने त्यांनी खालील ३६ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे.
वारस नोंदी प्रमाणपत्र, वारस नोंद पंचनामा, वारसाचा दाखला, वारस अहवाल, वंशावळ पंचनामा, रक्तनातेसंबंधाचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, अल्पभूधारक असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, एकत्र कुटुम्बाचे प्रमाणपत्र, विभक्त कुटुम्ब असल्याचा दाखला, विधवा-परित्यक्ता असल्याचा दाखला, पुनर्विवाह न केल्याचा दाखला, अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र, नगरपालिकेत हद्द असल्याचा, नसल्याचा दाखला, विद्युत जोडणीना हरकत दाखला, विद्युतपम्प असल्याचा वा नसल्याचा दाखला,
मालकीच्या शेतात विहीर आहे किंवा नाही याचा दाखला, ५०० फुटाच्या आत विहीर असल्या-नसल्याचा दाखला, शेतातील वृक्षांबाबत, भिक्षुक नसल्याबद्दल, धर्मादाय संस्थांकडून मदत घेत असल्या-नसल्याबाबात, जातीचा दाखला, कायदेशीर सज्ञान- अज्ञान असल्याचा दाखला, चल-अचल सम्पत्तीचा दाखला, दोन नावांची व्यक्ती एकच असल्याबाबत, जमिनीच्या घराच्या चतुःसीमा. शेतजमीन नकाशा, जमिनीच्या किंमतीचा पंचनामा, बागायत प्रमाणपत्र, मयत व्यक्ती ही कुटुम्बातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचा दाखला, मयत व्यक्ती कुटुम्बप्रमुख असल्याचा दाखला,आदी ३६ प्रकारचे दाखले.नियमाप्रमाणे आता तलाठी सातबारा उतारा ८ अ उतारा तसेच फेरफार उतारा याच्या प्रमाणित प्रती देतात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत