Breaking News

विरुर स्टेशन येथील कामासाठी सरपंच भाग्यश्री आत्राम यांच्या कडून पाठपुरावा विविध कामासाठी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

विरुर स्टेशन येथील कामासाठी सरपंच भाग्यश्री आत्राम यांच्या कडून पाठपुरावा विविध कामासाठी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : वर्धनी आरोग्य प्राथमिक केंद्र विरुर स्टेशन. वन उद्यान निर्मिती करणे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजना. चे कामासाठी माननीय सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम यांच्याकडून सतत पाठपुरावा केल्या जात आहे की आपल्या कार्यकाळात हातात घेतलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरपंच मॅडम सध्या धावपळ करीत असताना दिसून येत आहे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र विषयी त्यांनी DHO डिस्टिक हेल्थ ऑफिसर राज गहलोत साहेब यांची भेट घेतली.

 व त्यांना हॉस्पिटलमध्ये काही इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नाही व मनुष्यबळ कमी प्रमाणात आहे ॲम्बुलन्स बंद अवस्थेत असून ती बदलून देण्यात यावी आत्तापर्यंत कोणतीही समिती गठीत केली नाही ती त्वरित गठीत केली जावे व लवकरात लवकर एमबीबीएस डॉक्टर मिळावे यासाठी त्यांना विनंती करण्यात आली व DHO साहेबांनी त्वरित माननीय THO तालुका हेल्थ ऑफिसर नगराडे साहेब राजुरा यांना फोन द्वारे सर्व बाबी लक्षात आणून दिल्या व विरूर स्टेशन मध्ये आपण जे काही आपल्याकडून देता येईल ते इन्स्ट्रुमेंट व मनुष्यबळ लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांनी सूचना केली

 व आमच्या प्रश्नाचे निवारण केले तसेच विरूर् स्टेशन येथे वन उद्यान निर्माण व्हावे म्हणून उपवन संरक्षक वनविभाग मध्य चांदा चंद्रपूर यांची भेट घेण्यात आली व त्यांना विरुर् सर्कल मध्ये वाघाच्या दहशितेमुळे गावकऱ्यांना बाहेर फिरण्यास किंवा वॉकिंग करायला गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे म्हणून लवकरात लवकर वन उद्यान निर्मिती करून द्यावे यासाठी निवेदन देण्यात आले तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे काम संत गतीने चालू असल्यामुळे सरपंच मॅडम यांनी उपविभागीय अभियंता रामटेके मॅडम यांचेकडे नाराजी व्यक्त केली.

 उद्घाटन होऊन बरेच दिवस झाले तरी आपले काम कासव गतीने चालू आहे त्यामुळे गावकरी वर्गात आपल्याबद्दल रोश निर्माण होत आहे आपण रोडचे मॅपनुसार अंदाज पत्रकं नुसार सीमांकन करून द्यावे जेणेकरून काही अतिक्रमण असेल तर त्यांना खाली करण्याकरिता सूचना देता येईल तर रामटेके मॅडम यांनी मी स्वतः येत्या दोन दिवसात गावात येऊन साईड पाहून अंदाज पत्रक नुसार सीमांकन करून देऊ असे सांगितले त्यावेळेस त्यांना निवेदन देताना सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम विलास जी अक्केवार अजय रेड्डी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत