गोवरी येथे वृक्षारोपण व शेतकऱ्यांना वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न
गोवरी येथे वृक्षारोपण व शेतकऱ्यांना वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न
प्रकाश काळे व बादल गिरी यांचा वाढदिवस वृक्षारोण करून साजरा
महा घडामोडी न्यूज शहर प्रतिनिधी, राजुरा : वृक्षतोड झाल्याने जंगल नष्ट झाले आहे .त्यामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडला आहे. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे.झाडे लावा,झाडे जगवा या शासनाच्या संकल्पनेतून अंबुजा सिमेंट फांउडेशन उपरवाही,कृषी विभाग राजुरा,यांच्या संयुक्त विद्यमानातुन पवन कुनघाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दै.लोकमतचे गोवरी येथील पत्रकार प्रकाश काळे व ऑटो रिक्षातुन सेवा देणारे बादल गिरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गोवरी येथे शेतकरी बांधवाच्या व गावकऱ्यांच्या उपस्थित वृक्ष लागवड व गावकऱ्यांना विविध प्रकारच्या जातींच्या वृक्षाचे वितरण करण्यात आले.
शिवाजी हायस्कूल गोवरी येथे,वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रभाकर उईके,सहाय्यक शिक्षक आनंद चलाख, खामनकर, कृषी सहाय्यक वैशाली सोनटक्के, कोंतमवार, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे, प्रकल्प क्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार,रुपेश गेडेकर,रजनी खानोरकर,प्रकाश काळे उपस्थित होते. यावेळी मुख्यध्यापक प्रभाकर उईके व आनंद चलाख यांनी पर्यावरणाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले.
पर्यावरण समतोल राखणे ही काळाची गरज आहे,आणि प्रत्येकाने स्वतःची जिमेदारी म्हणुन एक तरी झाड लावावे,असे आवाहन गोपाल जंबूलवार यांनी केले. प्रकल्प क्षेत्र अधिकारी रजनी खानोलकर यांनी फळ झाडांची ओळख व त्याची जोपासना याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले.तसेच प्रकल्प क्षेत्र अधिकारी रुपेश गेडेकर यांनी शेतकऱ्यांनी फवारणी करताना वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर कसा करावा व किटकनाशकांच्या खाली डब्बांचा विल्हेवाट कसा करावा, प्रदुषण टाळण्यासाठी प्लास्टिक चा वापर टाळावा, यासंबंधी मार्गदर्शन केले.राजुरा कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक वैशाली सोनटक्के यांनी परसबाग संकल्पना वास्तव्य कशी उतरवावी व शासकिय योजना याबाबत मार्गदर्शन केले,
यावेळी ग्राम पंचायत सदस्य शंकर बोढे, चेतन बोबाटे,प्रतिष्ठित नागरिक आबाजी पिंपळकर,प्रभाकर जुनघरी,बंडू मशारकर,भास्कर जुनघरी,संतोष जुनघरी,श्रीधर जुनघरी,विकास पिंपळकर, रमेश सोनेकर,भूषण जुनघरी, धनंजय लोहे,प्रभाकर पिंपळकर,गणपत लांडे, दीपक उरकुडे,निखिल पिंपळकर,किशोर लोहे, केतन बोभाटे, विठ्ठल लोहे, मुर्लीधर वाघमारे,तेजस पाचभाई, आकाश गिरी,विनायक पिंपळकर,उमेश मुंगाने,अजय जुनघरी, लिपिक उरकुडे,शंकर लांडे, डाखरे , कवडाबाई डांगे व इतर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य मिळाले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सामाजिक संस्था व युवकांचे मौलाचे सहकार्य मिळाले.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत