शिवसेना महिला आघाडीत शेकडो महिलांचा प्रवेश
शिवसेना महिला आघाडीत शेकडो महिलांचा प्रवेश
प्रा. शिल्पाताई बोडखे, उज्वला नलगे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहिर
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख व प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे यांनी चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आढावा घेत नवीन महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर केल्या. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो महिलांनी शिवसेना महिला आघाडीत प्रवेश केला.
प्रा. शिल्पाताई बोडखे ह्या रविवारी चंद्रपूर जिल्हा दौर्यावर होत्या. चंद्रपूर, राजुरा व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या प्रमुख उपस्थितीत व चंद्रपूर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ. उज्ज्वलाताई नलगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुक्यातील रामपूर येथे ज्योती नळे, बल्लारपूर येथे कल्पना गोरघाटे, चंद्रपूर येथील नगीनाबाग येथे किरण जुनघरे व घुग्घुस येथे संध्याताई जगताप यांच्या माध्यमातून शेकडो महिलांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी वर्षाताई कोठेकर उपस्थित होते.
याप्रसंगी ठिकठिकाणी शिवसेना महिला आघाडीची कार्यकारणी घोषित करण्यात आली. यावेळी चंद्रपूर उपशहर प्रमुख म्हणून किरण जुनघरे, नगिनाबाग शाखा संघटीका निलू शेख, नगिनाबाग विभाग प्रमुख कोमल त्रिशुळे, राजुरा उपतालुका संघटीका ज्योती नळे, विभाग संघटीका गीता सकीनाला, रामपूर शाखा प्रमुख सरिता काटम, उपशाखा संघटीका शालिनी तलारी, उपविभाग संघटीका अनुसूर्या नुरती, गट शाखा संघटीका राधाबाई जुझपेली, घुग्घुस विभाग संघटीका संध्याताई रामू जगताप, विभाग उपसंघटीका संगीता देवराव बोबडे, शाखा संघटीका शोभा सायखेडे, शाखा उपसंघटीका गायत्री नाने यांना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या पत्राद्वारे नियुक्तीपत्र देऊन पदावर नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त महिला पदाधीकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत