मुंबई राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटना बांधणी विषयी चर्चा संपन्न
मुंबई राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटना बांधणी विषयी चर्चा संपन्न
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : मुंबई राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबुब भाई शेख यांच्या नेतृत्वात आगामी काळातील संघटने बाबतची ध्येय-धोरणे व संघटना बांधणी विषयी चर्चा करण्यात झाली. यावेळी पुढील ६ महिन्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करावयाचे कार्यक्रम, संघटन बांधनी व पदाधिकाऱ्यांवर देण्यात येणाऱ्या जवाबदारी या संदर्भात विस्तृत चर्चा झाली.
बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील साहेब यांच्या सोबत देखिल चर्चा करण्यात आली. त्यावेळी साहेबांनी देखील काही महत्त्वाच्या सूचना केल्या. आदरणीय साहेबांच्या सूचना व मार्गदर्शना नुसार आगामी काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस हे राज्यात संघटनात्मक धोरण राबवणार आहेत.
यावेळी माझ्यासह प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, निखिल ठाकरे, पुरुषोत्तम कडलग तसेच शिबीर विभागाचे समन्वयक निशांत वागमारे, आरोग्य विभागाचे समन्वयक गौतम आगा व मोहसीन शेख , प्रदेश सरचिटणीस अरुण असबे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत