Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत भगवा फडकविणार : प्रा. शिल्पा बोडखे

 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत भगवा फडकविणार : प्रा. शिल्पा बोडखे

'गाव तिथे महिला शाखा' व 'घर तिथे महिला शिवसैनिक' अभियानाची सुरुवात

महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा येथे महिला आघाडी संघटन मजबूत झाल्यास तळागळातील महिलांचे प्रश्न सोडविता येईल. एक महिला कुटुंब सांभाळून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झेप घेऊ शकते म्हणून महिलांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून राजकारणात यावे व निवडणूकीत सहभागी होऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत महिला आघाडी भगवा फडकविणार असल्‍याचा विश्‍वास शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे यांनी व्‍यक्‍त केला.

शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका उज्वला प्रमोद नलगे यांच्या आयोजनाखाली पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे नुकत्‍याच दोन दिवशीय चंद्रपूर दौऱ्यावर आल्‍या होत्‍या. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शिवसंपर्क महिला मेळाव्‍यादरम्‍यान बाेलत होत्‍या.

               

शहरात वाॅर्ड तिथे महिला शाखा व ग्रामीण भागात गाव तिथे महिला शाखा या अभियानांतर्गत चंद्रपूर विधानसभेतील तुकुम, अष्टभुजा वाॅर्ड, रमाई नगर येथे महिला शाखा सुरू करण्यात आली.

11111111111

घरोघरी शिवसेना लोकांच्या मनात पोहचविण्यासाठी नवनवीन महिलांचा शिवसेनेत प्रवेश घेऊन घर तिथे महिला शिवसैनिक या संकल्पनेखाली मोहीम चालू करण्यात आली.


चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महिला शिवसैनिक उद्धवसाहेबांसोबत आहेत आणि सदैव राहणार असून सर्वांनी एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली.

 

 चंद्रपूर जिल्ह्यातील शहरात, बल्‍लारपूर, राजुरा येथील गोंडपिंपरी येथे महिला आघाडीची बैठक घेऊन कार्यकारिणी तयार करण्यासाठी पदांसाठी इच्छुक महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच उपस्थित सर्व महिलांना प्रा. शिल्पा बोडखे यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका उज्वला नलगे यांच्या आयोजनाखाली


पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या संपूर्ण दौ-याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच वर्षा कोठेकर यांच्‍या जनसंपर्क कार्यालयाचे शिल्पाताई बोडखे यांनी हस्ते उद्‌घाटन केले व महिला शाखा देखील उघडण्यात आली. यावेळी उपजिल्हा युवती अधिकारी रोहिणी पाटील, बबली पारूल आदीं महिलांची मोठ्या संख्येने उपस्‍थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत