टाकळी ढोकेश्वर मध्ये पॉलिशच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवले
टाकळी ढोकेश्वर मध्ये पॉलिशच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवले
पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,दत्ता ठूबे, पारनेर : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ५४ वर्षीय महिलेच्या घरातील देव व दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दीड तोळ्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. आरोपी दुचाकीवरून आलेले होते. या प्रकरणी जितेंद्र विश्वनाथ घोडके (वय ३०, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. आरोपींनी घोडके यांच्या घरी येत तांब्याचे व इतर धातूच्या वस्तू पॉलिश करून देतो, सांगितले. फिर्यादीच्या आईने तांब्याचे भांडे आणि देव आरोपींकडे दिले असता आरोपींनी त्याला पॉलिश करून दिले. त्यानंतर मंगळसूत्र चमकवायचे आहे का,
असे विचारत फिर्यादीच्या आईने मंगळसूत्र आरोपींकडे दिले. आरोपींनी मंगळसूत्र किचनमध्ये नेत एका भांड्यात पाणी, हळद टाकत त्यांच्याकडील लाल रंगाचे लिक्वीड टाकले. दहा मिनीटांनंतर गॅस बंद करून त्यातील मंगळसुत्र काढून घ्या, असे फिर्यादीच्या आईला सांगत आरोपी घाईघाईने घराबाहेर निघाले.
संशय आल्याने फिर्यादीच्या आईने घरात जात भांड्यामध्ये पाहिले असता मंगळसुत्र दिसून आले नाही. त्यानंतर आरोपींनी मंगळसूत्र चोरून नेल्याची फिर्यादी च्या आईच्या लक्षात आले. आरोपींचा परिसरातील नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी मिळून आले नाही. सहायक फौजदार गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत