गोठ्यात शिरून बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त तर दोन शेळ्या बेपत्ता
गोठ्यात शिरून बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त तर दोन शेळ्या बेपत्ता
महा घडामोडी न्युज नेटवर्क, सावली : सावली येथील नागसेन कॉलोनी प्रभाग क्र.16 येथील रहिवाशी श्री,सुरेश मार्कंडी गुंटूकवार यांच्या राहत्या घरी असलेल्या गोठयात आज दि.6/8/2022 च्या पहाटेच्या सुमारास बिबट्या गॉसिखुर्द नहराने येऊन गोठयात घुसून दोन शेळ्या फस्त केल्या यामुळे नागसेन कॅलोनी परिसरात मोठी दहशत पसरली आहे.
घटनेचा पंचनामा विश्वास चौधरी सर यांनी केला असून तो बिबट असल्याचे सांगितले आहे,मानवी वस्तीत बिबट्याचा शिरकाव असल्याने नागरीकात भीतीचे वातावरण असून या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संकलन : योगेश रामटेके



कोणत्याही टिप्पण्या नाहीत