बस स्टॅण्डवरून दागिने पळविनारी महीलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात
बस स्टॅण्डवरून दागिने पळविनारी महीलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात
एकूण २,८०,०००/- रू. चे सोन्याचे दागिणे जप्त.
महा घडामोडी न्युज नेटवर्क,वर्धा : फिर्यादी सौ. कांता ज्ञानेश्वर झोरे ह्या दिनांक ३१-०७-२०२२ रोजी त्यांचे नातेवाईकाचे वास्तुशांती करीता हिंगणघाट बस स्टॅण्ड येथून वर्धेला येण्याकरीता बसमध्ये बसत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले १२ तोळे सोन्याचे दागिणे चोरून नेल्याने फिर्यादीने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे हिंगणघाट येथे अप. क्र. ८८४/२०२२ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून गुन्हे प्रकटीकरण प्रथकास सदर गुन्हयाचा तपास सोपविण्यात आला. सदर गुन्हे प्रकटीकरण पथकाने हिंगणघाट शहर, यवतमाळ, वणी, वरोरा, पाढरकवडा व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन अनोळखी आरोपीतांचा शोध घेवून सदर गुन्हयातील आरोपी नामे १) सौ. मालाबाई मनोहर मानकर, वय ४२ वर्ष, २) सौ. कविता जतन नाडे, वय ४० वर्ष, ३) कु. संगीता कन्ना नाडे, सर्व, रा. शताब्दी नगर, रामेश्वरी टोली, अजनी, नागपुर यांना अटक करून सदर महिला आरोपींकडुन गुन्हयात चोरीस गेलेले संपुर्ण सोन्याचे दागिणे एकूण किंमत २,८०,०००/- रू. चा माल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. प्रशांत पाटणकर, पोउपनि सोमनाथ टापरे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, संग्राम मुंडे, प्रेमिला गुजरकर यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत