Breaking News

१५ वर्षाच्या मुस्लीम किशोरवयीन मुलाने केले दोन वर्षात कुराण मुखपाठ !

 १५ वर्षाच्या मुस्लीम किशोरवयीन मुलाने केले दोन वर्षात कुराण मुखपाठ !

केरोळीच्या काजी सय्यद सोहेलचे अदभूत कामगिरी ! 

महा घडामोडी न्युज नेटवर्क, माहूर : इस्लाम धर्मीय अनुयायीचा पवित्र धर्मग्रंथ मानला जाणाऱ्या कुराण मधील संपूर्ण सुरे शालेय शिक्षण घेत असतांना अवघ्या दोन वर्षात मुख पाठ करून दाखविल्याची अदभूत कामगिरी माहूर तालुक्यातील केरोळी येथील काजी सय्यद सोहेल सय्यद निजामोद्दीन या १० व्या वर्गात शिक्षक घेत असलेल्या किशोर वयीन मुलाने केल्याने माहूर तालुक्यातील मुस्लीम समाजबांधवसह राज्यभरातून काजी सय्यद सोहेल सय्यद निजामोद्दीन चे कौतुक होत आहे.

 काजी सय्यद सोहेल चे वडील सय्यद निजामोद्दीन हे जि.प. प्रा. मराठी शाळेचे शिक्षक असून मुलगा सोहेल यास त्यांनी मदरसा मध्ये शिक्षणास पाठविण्याऐवजी शालेय शिक्षणाचा मार्ग निवडला परंतु त्यांचे कुटुंब हेच मुळात मुस्लीम समाजातील काजी असल्याने सोहेल यास आपसूकच धर्म व धर्मग्रंथाची आवड होती. त्यामुळे त्यास वयाच्या १० व्या वर्षापासूनच पवित्र धर्मग्रंथ कुराण बाबत आकर्षण निर्माण झाल्याने संपूर्ण ग्रंथच मुखोदगत करण्याचा संकल्प करून कोरोना लॉकडाउनच्या काळात कुराण धर्मग्रंथा मधील प्रत्येक सुरे मनपूर्वक वाचन, मनन, चिंतन करून अवघ्या दोन वर्षात संपूर्ण धर्मग्रंथ मुखपाठ करण्याची कामगिरी केली. 

 यामुळे सोहेलच्या आई वडील व कुटुंबियांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याचे मानल्या जात आहे. यावेळी जामा मस्जिद माहूरचे इमाम मुफ़्ती खुर्शीद साहब यांनी हे म्हणाले की, सय्यद सोहेल यांनी आमच्यापेक्षाही सरस कार्य केलेले असून त्याने यापुढे त्यास मुखपाठ झालेल्या कुराणच्या माध्यमातून इस्लाम अनुयायी बांधवाना कुराण शिकविण्याचे काम करावे आणि धार्मिक कार्याचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे करावा आशा शुभेच्छा दिल्या.

पुसद येथे शालेय शिक्षणास असलेल्या सोहेल यास दि.०७ ऑगस्ट २०२२ रोजी मस्जिदमधील एका कार्यक्रमात सोहेल यास कुराण सांगण्याची संधी मिळाली असता त्याने कुराण मधील संपूर्ण सुरे ग्रंथ समोर न घेता व वाचन न करताच मुखपाठ असल्याने अस्खलितपणे सांगितले. सय्यद सोहेल याचे उस्मानिया मखतब पुसदचे प्रमुख व मौलाना कारे वसीम, माहूर येथील जामा मस्जिदचे इमाम मुफ़्ती खुर्शीद साहब, हजरत मोलाना मुफ्ती अनवर साहब,हाफीज साकीब मदनी,हजरत मौलाना वसीम ,हजरत मौलाना जावेद कासमी,हजरत मौलाना मुफ़्ती आसिफ, हजरत मौलाना शकील हुसैनी,हाफिज सिद्धिक मदनी,मौलाना खलील शमशी,मौलाना अताउल्लाह सिरजी ,हजरत मौलाना निसार मिल्ली, मौलाना साबिर अरणी ,इरशाद ईशाउती, हाफिज फ़िरोज़ यांनी सय्यद सोहेल याचे कौतुक करून त्याचे आईवडील व कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत