Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर द्वारा आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर द्वारा आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न 

महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : मुलांमधील क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोटरी व रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर द्वारा दिनांक 6 व 7 ऑगस्ट 2022 ला क्रीडा संकुल विसापूर (बल्लारपूर) येथे आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेकरिता बल्लारपूर तालुक्यातील 17 शाळेतील 172 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने मुलींचाही सहभाग होता. ही स्पर्धा इयत्ता 5 ते 7 व इयत्ता 8 ते 10 या दोन गटात एकेरी व दुहेरी स्वरूपात घेण्यात आली. 7 ऑगस्ट 2022 ला आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मुख्य अतिथी माननीय कांचन जगताप तहसीलदार बल्लारपूर, प्रफुल चरपे अध्यक्ष रोटरी बल्लारपूर, चैतन्य पटेल अध्यक्ष रोट्रॅक्ट बल्लारपूर ,महेश कायरकर सचिव रोटरी बल्लारपूर व मनीष मूलचंदानी प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरी बल्लारपूर यांची उपस्थिती होती .पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,नंतर प्रास्ताविकेत मनीष मूलचंदानी यांनी स्पर्धा घेण्यामागचं उद्देश समजावून सांगितला. पाहुण्यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व शील्ड प्रदान करण्यात आले .माननीय कांचन जगताप तहसीलदार बल्लारपूर यांनी आपल्या मनोगतात रोटरीने घेतलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली. 

मुलांमधील सुप्त गुणांना ,क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा महत्त्वाच्या असतात. रोटरीच्या विविध उपक्रमासाठी आपले सतत सहकार्य असेल असे सांगितले .माननीय प्रफुल चरपे अध्यक्ष रोटरी बल्लारपूर यांनी आपल्या मनोगतात रोटरी बल्लारपूर द्वारा आयोजित विविध उपक्रमांची व होऊ घातलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत इयत्ता 8 ते 10 गटात एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्णव प्रकाश ,दिलासा ग्राम कॉन्व्हेंट बल्लारपूर व द्वितीय क्रमांक निलेश निषाद, वैभव कॉन्व्हेंट बल्लारपूर तर दुहेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक आशुतोष राजकुमार व यश माहूरकर, दिलासाग्राम कॉन्व्हेंट बल्लारपूर तर द्वितीय क्रमांक सई राजेश चिंतावार व अंतरा एस. चव्हाण दिलासा ग्राम कॉन्व्हेंट बल्लारपूर यांनी मिळविला.

 तसेच इयत्ता 5 ते 7 या गटात एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक सक्षम गौतम, वैभव कॉन्व्हेंट बल्लारपूर तर द्वितीय क्रमांक प्रभाजन शर्मा, वियाणी ज्यूबली स्कूल बल्लारपूर तर दुहेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक सक्षम गौतम व अनिकेत सूर्यवंशी, वैभव कॉन्व्हेंट बल्लारपूर तर द्वितीय क्रमांक कृष्णा यादव व पियुष शाह, गुरुनानक पब्लिक स्कूल बल्लारपूर यांनी मिळविला.या स्पर्धेकरीता शुभम बन्नेवार व प्रणय महाजन यांनी पंचाची भूमिका नीट बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन रवी साळवे तर आभारप्रदर्शन रोटेरियन निलेश चिमड्यालवार यांनी केले.

    या उपक्रमासाठी रोटेरियन उमेश पटेल,कल्पेश पटेल,राहुल वरू,राजू मुंधडा,प्रशांत दोंतुलवार,कल्पेश पटेल ,अनुप गंगशेट्टीवार, अजय वासलवार,आकाश गेडाम,उत्तम पटेल,निखिल गुजरकर,,प्रशांत भोरे, वैभव मेनेवार,विक्रांत पंडित,हर्षद गंधेवार,अखिल निखारे तर रोट्रॅक्टर राम तम्पालु,गौरव पटेल ,मोहित पटेल,रजत परमार,जयेश पटेल व भाविक पटेल यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत