शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या : जनसेवक पवन मस्के
शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या : जनसेवक पवन मस्के
महा घडामोडी न्युज नेटवर्क, भंडारा : गेल्या आठवड्याभरामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजविला असून पाऊस थांबला असला तरी मात्र अद्यापही पुर ओसरलेला नाही अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांचे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर दुसरीकडे नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरला आहे यामध्ये अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे.
तर जीवनावश्यक वस्तूंचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या बाबीची गंभीर दखल घेत काँग्रेस कमिटीचे भंडारा जिल्हा सचिव पवन मस्के यांनी गणेशपुर जिल्हा परिषद क्षेत्रामधील तसेच भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व स्थानिक नागरिकांची त्यांनी संवाद साधला यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांना आपली आपबीती सांगत सगळा नष्ट झाला असून आता जगण्यासाठी काहीच उरला नाही अशी आर्त हाक सांगितली या बाबीची गंभीर दखल घेत जनसेवक पवन मस्के यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
अशी मागणी शासन प्रशासनाकडे केली आहे युद्ध पातळीवर शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. भंडारा जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची माहिती जनसेवक मस्के यांनी शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट घेऊन करून घेतली. तळागळात जाऊन काम करणारा नेता म्हणून जनसेवक पवन मस्के यांची जनमानसात ओळख आहे.
कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून लोकांच्या कठीण काळात त्यांनी केलेले भोजनदानाचे कार्य हे भंडारा जिल्ह्यातील नागरिक कधीही विसरू शकणार नाही असे एक ना अनेक कार्य जनसेवक पवन मस्के यांनी केले असून आता पूरग्रस्त यांच्या मदतीला ते धावून आले आहेत शासन प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत