कोरठणला गणपती मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण मुहूर्तामध्ये बदल
कोरठणला गणपती मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण मुहूर्तामध्ये बदल
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठूबे, पारनेर : लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान,पिंपळगावरोठा,तालुका पारनेर या राज्यस्तरीय"ब"वर्ग तीर्थक्षेत्रावर नवीन बांधण्यात आलेल्या गणपती मंदिरात श्री गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रम रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी नियोजित केलेला होता परंतु श्री श्री 1008 भागवत मुनी फलाहारी महाराज श्रीधाम वृंदावन मथुरा यांनी सुचित केल्यानुसार संन्यासि जनांच्या चार्तु:मासानंतर रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 या शुभमुहूर्तावर श्री गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम श्री महाराजांचे शुभहस्ते करण्यात येईल.
तरी सर्व भाविक,भक्त,देणगीदार यांना कळविण्यात येते की,श्री कोरठण खंडोबा देवस्थान मधील कार्यक्रमाच्या मुहुर्तांमध्ये झालेला बदल नोंद करून घ्यावा ही विनंती.असे आवाहन विश्वस्त मंडळ -श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान व समस्त ग्रामस्थ पिंपळगावरोठा तालुका पारनेर यांनी केले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत