माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या वाटेवर
माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या वाटेवर
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रवीण चिडे, विरुर स्टेशन : निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे श्री सुरेश पावडे काँग्रेस पक्षात जाण्याच्या चर्चांना उधान आल्याचे दिसून येत आहे सुरेश पावडे हे आधी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करायचे पक्षाचे कोणतेही आंदोलन असो ते सर्वात आघाडीत दिसायचे त्यांनी पक्ष संघटना जास्त नसून सुध्धा साहेबाचा आदेश मनून मागील जिल्हा परिषद निवडणूक अविनाश जाधव यांच्या विरोधात लढवली त्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला
तरीपण त्यांनी पक्षाची व निमकर साहेबाची साथ सोडली नव्हती पण मागील विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सुदर्शन निमकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने सुरेश पावडे तेव्हापासून जास्तच नाराज दिसून येत आहे सध्या तरी ते कोणत्याही पक्षात सक्रिय नसून सदया काँग्रेस पक्षात जाण्यास इचुक दिसत आहे जर का ते कांग्रेस मध्ये गेले तर त्यांचं स्वागतच होईल असे सूत्रांकडून सांगितल्या जात आहे होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक बघता काँग्रेसला एक मोठा ओबीसी चेहरा विरु्र स्टेशन मध्ये मिळेल अशी कार्यकर्ता मध्ये बोलले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत