Breaking News

सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्या, सात वर्षाच्या मुलावरही कोयत्याने वार

 सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्या, सात वर्षाच्या मुलावरही कोयत्याने वार 


(महा घडामोडी न्यूज नेटवर्क)  लातूर : रजनीकांतने अनेक वेळा तिला घरी परत येण्यास सांगितले. मात्र ती पतीसोबत नांदायला यायला तयार नव्हती. यावरुन रजनीकांतचे सासू आणि पत्नीसोबत सतत वाद व्हायचे.

पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाने सासूची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. इतकेच नाही तर आरोपीने स्वतःच्या सात वर्षाच्या मुलावरही कोयत्याने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रजनीकांत वेदपाठक (35) असे जावयाचे तर चंद्रसेना वेदपाठक (50) असे हत्या करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. सुदैवाने पत्नी यावेळी घरी नसल्याने ती बचावली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत