सेलू प्रकरणात 36 तासात आरोपी ताब्यात
सेलू प्रकरणात 36 तासात आरोपी ताब्यात
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : सेलू येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 36 तासाच्या आत नराधम आरोपीना मोठ्या शिताफिने अटक केली.सेलू पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.06 ) एक तक्रार दाखल झाली.त्यातून एका अल्पवयीन मुलीस व तिच्या अल्पवयीन भावास जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसउन पळून नेले. भावास मारहाण करीत ढकलून दिले व मुलीवर अत्याचार केला.असे त्या तक्रारी द्वारे नमूद केले.
पीडित मुलगी व तिचा मावस भाऊ हे त्यांच्या शेतातून महालक्ष्मी सना निमित्त हराळी गवत सेलू येथे घेऊन जात असताना सेलू शहरालगतच्या परिसरातील खाणीचा मारोती मंदिर परिसरात दर्शन करून बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन आरोपीनी पिडीत मुलगी व तिच्या मावस भावास जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवर बसविले.त्या नंतर आरोपीनी दोघांना बोरी परिसराकडे नेले. मावस भावास मारहाण करून गाडीवरून ढकलून दिले. तर मुलीवर अत्याचार केले.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्राररीच्या आधारे याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गु. र.नं.371/2022मध्ये भा.द. वी कलम 363, 366 अ 376 (2) (आय )376(2)जे 376 डी 506 34 तथा बालकाचे लैगिक अपरधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 4,8,12अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यापासून पोलीस अधीक्षक जयंत मीना अपर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,सहायक पोलीस अधिक्षक तथा परभणी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार, स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण पोलीस निरीक्षक संजय करनूर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गाडेवड जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तूलवार, बोरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुळे चारठाणा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुय्यड पोउपनि नागनाथ तुकडे,पोउपनि व्यंकट कुसमे हे सर्व अधिकारी स्वतः व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तीन पथक सायबर सेलचे एक पथक व सेलू, जिंतूर, बोरी, चारठाणा पोलीस ठाण्याचे प्रत्येकी एक व वाहतूक शाखेचे एक पथक असे 10पथके स्थापन करण्यात आली.
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासह आरोपीचा मार्ग ट्रेस करणे व आरोपी निष्पन्न करणे याकरिता पोलिसांनी आरोपीचे उपलब्ध झालेले फोटो फुटेज यांचा तांत्रिक अभ्यास केला गोपनीय सूत्र धारकांकडून आरोपीची माहिती मिळविण्यास सुरुवात केली.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिंतूर,सेलू,बोरी, चारठाणा परिसरातील हॉटेलस, ढाबे विविध, आस्थापना आरोपीचे लपण्याचे संभावित ठिकाणे परिसर या ठिकाणी जाऊन चौकशी केली आरोपी संदर्भातल्या माहितीची पडताळणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा नेमका ठावठीकांना काढला.
दरम्याच्या काळात आरोपीना यांचा सुगावा लागल्याने या प्रकरणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीना ताब्यात घेण्यासाठी सेलू, जिंतूर, बोरी,व चारठाणा परिसरात सापळालावण्यात आला बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी सह आरोपी फरार होत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करीत संबंधित आरोपीना त्यांच्या गावालगत पाठलाग करून ताब्यात घेतले.यावेळी घेतलेल्या झडतीत गुन्ह्यात वापर केलेल्या दुचाकी सह अन्य महत्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.दरम्यान गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार हे करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत