राजुरा तालुका युवक काॅग्रेस अध्यक्षाचे एल.सी.९४ रेल्वे गेट चुनाळा येथील वाहतुक सुरळीत करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे मागणी
राजुरा तालुका युवक काॅग्रेस अध्यक्षाचे एल.सी.९४ रेल्वे गेट चुनाळा येथील वाहतुक सुरळीत करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे मागणी
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : गावांची प्रगतीची वाट म्हणून खेडयातील रस्ताकडे पाहीले जाते. या रस्त्यांमुळे खेडयातील संपर्क शहरांशी येऊन गांव विकासास चालना मिळते.पण अलीकडे राजुरा व सिंधी रस्तावरील चुनाळा येथील रेल्वे गेट लोकांना समस्यांचा डोंगर बनला आहे. या मुख्य रस्त्याच्या रेल्वे लाईन गेट समोर गाड्यांच्या रांगा लागतात. आणि पावसाळी दिवसांमुळे रेल्वे गेट बाजुचा बोगदा ही भरलेला आहे. त्यामुळे लोकांना खुप त्रास सहन करावा लागत होता. बाजुचा बोगदा सुध्दा रेल्वे विभागांने बंद केला आहे.
तरी हा बोगदा चालु करून ह्या रस्त्याची वाहतूक सुरळीत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेता राजुरा युवा काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष व विहीरगांव येथील माजी उपसरपंच इर्शाद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे व खासदार बाळुभाऊ यांच्याकडे निवेदन सादर केले व त्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे.आणि हा रस्ता तात्काळ सुरळीत करण्यात यावा यासाठी मागणी केली आहे. यावेळी उपस्थितीत रामभाऊ देवईकर,विकास देवाळकर, अजय रेड्डी, सुरेश पावडे, धनराज चिचोंलकर, अविनाश जेनेकर, मारोती मोेरे , मंगेश रायपल्ले, केशव वांढरे, प्रविण चिडे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत