75 वर्षानंतरही नरसापूर ग्रामस्थांना मिळेना पूल
75 वर्षानंतरही नरसापूर ग्रामस्थांना मिळेना पूल
पूर आलकी संपर्क तुटतो ;आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा निर्णय
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झगमगाटात पार पडला. मात्र दुसरीकडे सेलू तालुक्यातील नरसापूर येथे गावाला जोडणारा करपरा नदीवरील पूल उभारणीचा प्रश्न अद्यापही सुटला नाही.त्यामुळे मागील 75 वर्षांपासून पावसाळ्यात येथील ग्रामस्थाचे होणारे अतोनातहाल कधी थांबनार असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीत मतदान करण्यास बहिष्कार घातला आहे.
सेलू तालुक्यातील नरसापूर या गावाची लोकसंख्या 475 आहे.बोरिकीनी येथून या गावात येताना करपरा नदीवरील पूल ओलडावा लागतो.मात्र हा पूल उभारणीकडे राजकीय नेते व प्रशासनातील अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे.ही बाब अमृत महोत्सवी वर्षात अधोरेखित करणारी आहे.या नदीला पूर आलाकी गावातील ग्रामस्थांचा इतर गावाशी संपर्क तुटतो त्यामुळे दळणवळना सह इतर सुविधा साठी ग्रामस्थाना अतोनात हाल सहन करावे लागत आहे.
या पूल उभारणी साठी राजकीय नेते व अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी केवळ आश्वासन दिले गेले मात्र त्या आश्वासनाचा पुरत्तेसाठी कोणीही पुढे आले नाही. आता जोपर्यंत पूल उभारला जात नाही तो पर्यंत आगामी निवडणुकीत मतदान करायचे नाही या बाबत गावात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यामध्ये सर्व 176 मतदारांनी सह्या केल्या आहेत.अगोदर पूल बाधा अन्यधा मतदानसाठी बहिष्कार राहील असे या स्वाक्षरीचे निवेदन मच्छिन्द्र ढाले समाधान तरटे कल्पेश वाकळे संजय ढाले अमोल घुगे यांच्यासह आदिनी सेलू येथील तहसीलदार दिनेश झापले यांना दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत