Breaking News

मातंग समाजाच्या विवीध मागण्या संर्दभात बोदवड तहसिलदार यांचे मार्फत लहुजी संघर्ष सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 मातंग समाजाच्या विवीध मागण्या संर्दभात बोदवड तहसिलदार यांचे मार्फत लहुजी संघर्ष सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, जळगाव : लहुजी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष मा सुरेश बहिलम साहेब यांचे आदेशानुसार तथा महासचिव दिपक सोनोने, युवक अध्यक्ष स्वप्निल सपकाळे, महिला अध्यक्ष मिनाक्षी सकट राज्य संगठक रामचंद्र मगरे, जळगांव जिल्हा अध्यक्ष रविंद्र पवार जळगांव युवक अध्यक्ष दिपक गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली आज लहुजी संघर्ष सेना बोदवड तालूक्याच्या बोदवड तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

निवेदनात मातंग समाजाला लोकखंख्येच्या प्रमाणात आरक्षण , बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करणे, मातंग समाज अभ्यास आयोगाच्या सर्व मागण्या माण्य करुन त्या त्या विभागा मार्फत जी.आर काढाण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी जिल्हा संघठक जितू सोनवणे, बोदवड तालूका अध्यक्ष अजय पवार, जामनेर तालूका अध्यक्ष देवानंद दोडके, कपिल दोडके,सचिव संजय खंडारे, यांचेसवे बोदवड व जामनेर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत