Breaking News

शेतकऱ्याची समस्या घेऊन विरुर चे भाजपा पदाधिकारी यांनी दिले वरिष्ठांना निवेदन

अधिकाऱ्याने आठ दिवसात समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरुर : राजूरा तालुक्यातील विरुर स्टेशन शेत्रातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना विजेच्या अनियमितेसंदर्भात अडचणींचा सामना करावा लागत होता. याविषयी राजुरा येथील विश्रामगृहामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली, परिसरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याकरीता म.रा.वि.वि.कं. चे कार्यकारी अभियंता तेलंग साहेब यांचेसह बैठक घेण्यात आली.

या परिसरातील शेतकर्‍यांना लोडशेडिंगचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो, त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, विरुर,खंबाडा,नवेगाव, कविटपेट,चिंचोली,केळझर,धानोरा,चुनाळा, मुर्ती येथिल अनेक शेतकऱ्यांना पोल कनेक्शनची आवश्यकता आहे, त्यांना पूर्तता करावी. अनेक जागी विजेच्या तारा पडल्या आहेत, त्यांचा धोका लक्षात घेऊन तत्परतेने त्यांच्या दुरूस्त्या कराव्या, काही गावांमध्ये स्ट्रीट लाईनचे पोलांची पडझड झाली आहे, अशा जागी Accidental Spot लक्षात घेऊन, येत्या आठ दिवसांत दुरुस्त्या केल्या जाव्यात, विजेच्या धक्क्याने वारलेल्या बैलांची नुकसान भरपाई प्रभाकर राऊत शेतकऱ्यांना लवकर द्यावी. धोक्याच्या जागी ट्री कटिंग व्हावी, अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी याप्रसंगी विद्युत विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.

बैठकीनंतर, तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना भेटून सर्वांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, सतिश कोमरवेल्लीवार, भिमराव पाला, प्रदिप पाला, उप कार्यकारी अभियंता श्रीनिवास बडगू, कनिष्ठ अभियंता मकासरे,चूनालाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, गौतम रामटेके, प्रभाकर राऊत यांचेसह आदी मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत