Breaking News

एकाच परिवारातील चौघांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

 चौघांपैकी, महिलेचा मृत्यू,दोन मूले व वडील गंभीर

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, विनोद दोनाडकर, ब्रह्मपुरी : तहसील कार्यालयात नोकरीवर असलेल्या एका रिटायरमेंट रमाकांत ठाकरे यांच्या परिवारातील मुलांसह कुटुंबातील सर्वच व्यक्तीने विश प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामध्ये ब्रह्मपुरीतील देललवाडी अपार्टमेंटमध्ये कार्यरत ठाकरे परिवारातील रमाकांत ठाकरे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, दोन मुले गंभीर व वडील रमाकांत ठाकरे हे सुद्धा नॉट रीचेबल आहेत.

प्राप्त माहितीनुसार वडील रमाकांत ठाकरे हे ब्रह्मपुरीच्या तहसील कार्यालयात नोकरीवर होते. परंतु मुलांना नोकरी लागत नसल्यामुळे घरी परिवारात नेहमी फटके उडायचे, शिवाय चांगला वातावरण राहत नसल्याने, गरीब मुले लग्नाचे झाल्यानंतर परिस्थिती बेताची नव्हती, नेहमीच पैशाची अडसर भासायची शिवाय लग्न मुलांचे करायचे आणि नोकरी लावायची कुठून असा प्रयत्न या परिवारात सुरू होता. 

त्यातच अजीर्ण परिस्थितीतून मार्ग काढायला प्रयत्न मिळाल्यामुळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असल्याची माहिती प्रसार माध्यमांसमोर येत आहे. त्यापैकी दोन मुला सह वडीलाची सुद्धा प्रकृती गंभीर असून रात्री बारा वाजता सामूहिक परिवारांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी गीता ठाकरे यांचा जास्त विष प्राशन सेवनाने मृत्यू झाला, असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे.

प्रकृती गंभीर असलेल्यापैकी नावे : रमाकांत दामोदर ठाकरे वडील वय 53 राहुल रमाकांत ठाकरे 27 मनोज रमाकांत ठाकरे वय 26 हे गंभीरित्या जखमी असून त्यांना गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत