Breaking News

कोरठण खंडोबा विश्वस्त पदावर अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांची फेरनिवड

 कोरठण खंडोबा विश्वस्त पदावर अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांची फेरनिवड 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मा. आ. नंदकुमार झावरे यांच्याकडून सत्कार 

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,दत्ता ठुबे, पारनेर : लाखो भाविक भक्तांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान श्री कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता. पारनेर, जि. अहमदनगर या राज्यस्तरीय "ब" वर्ग तीर्थक्षेत्र देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त म्हणून ऍड  पांडुरंग गायकवाड यांची फेरनिवड सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडून करण्यात आली आहे.

111111111111111111111111111111

त्याबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मा. आ. नंदकुमार झावरे यांनी  गायकवाड यांचा सत्कार केला आहे.  नंदकुमार झावरे पारनेरचे आमदार असताना सन १९९०-९१ मध्ये   गायकवाड यांनी श्री कोरठण खंडोबा देवस्थानचा जीर्णोद्धार आणि सेवा कार्याला सुरुवात केली होती. तेव्हापासून ३२ वर्षात देवस्थानचा झालेला विकास आणि  गायकवाड यांचे देवस्थानचे सेवा कार्याबाबत  नंदकुमार झावरे यांनी मनोमन समाधान व्यक्त केले. ऍड  पांडुरंग गायकवाड यांनी श्री नंदकुमार झावरे यांचे आशीर्वादही घेतले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत