शासन नियम बाह्य फेर फार मंजुर केल्या प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर टांगली तलवार
शासन नियम बाह्य फेर फार मंजुर केलेल्या बिलोली येथील तलाठयास व मंडळ अधिकारी यांना मा उपविभागीय अधिकारी मार्फत तहसीलदार बिलोली यांची नोटीस
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,राजाराम पाटील, बिलोली : बिलोली तालुक्यातील सज्जा भोसी अंतर्गत मौ. लिंगापूर (बे) येथील शेत गट क्रं 111 मधील सामाईक असलेल्या, खातेदाराच्या नावे कोणताही शासकीय आदेश नसताना, फेर क्रमांक 489 हा मंजूर झाले.
बाबतची तक्रार दगडापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील जाधव यांनी मा तहसीलदार यांना दिनांक 14 /9/ 2022 व मा. उपविभागीय अधिकारी बिलोली यांना दिनांक 15 /9 /2022 रोजी वरील नियमबाह्य फेरफार बाबत, योग्य ती चौकशी करून मंडळ अधिकारी एल जी तोटावाड मंडळ बिलोली व तलाठी मॅकलवाड एस जी सजा भोसी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी तक्रार दिली.
दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ स्वतः लक्ष घालून दखल घेतली, व तलाठी सज्जा भोसी मंडळ अधिकारी तोटावाड यांच्यावर झालेले नियमबाह्य फेरफार बाबत 24 तासाच्या आत खुलासा द्यावा, अशी दोघांनाही नोटीस काढली असून, जर विहित मुदतीत खुलासा सादर नाही केल्यास, आपले काहीही म्हणने नाही.
असे गृहीत धरून आपल्या विरुद्ध शासन परिपत्रक 16 जुलै 2014 व या कार्यालयाचे परिपत्रक 20/5/2020 या आदेशान्वये नागरी सेवा व शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुद व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे आदेशित केले आहे. त्यावर दोन्ही अधिकारी कर्तव्यदक्ष म्हणून परिचित असून परिसरातील जनतेचे दोन्ही अधिकाऱ्याच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत