Breaking News

अस्वलीच्या हल्ल्यात इसम जखमी

 अस्वलीच्या हल्ल्यात इसम जखमी

उपक्षेत्र केळझर नियती क्षेत्र सुशी कक्ष क्रमांक 676 येथील सदर घटना

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गणेश परचाके,पोंभुर्णा : मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील अस्वलीच्या हल्ल्यात इसम जखमी सदर इसमाचे नाव श्री. चरणदास सीतकुरा भंडारी वय ५४ वर्ष सदर ही व्यक्ती दाबगाव येथील रहिवासी असून ही खळबळ सुमारे सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान घडली. 

सदर ती व्यक्ती आपल्या शेताकडे जाण्यास निघाला असता. त्याच शेताला लागून असलेले जंगल क्षेत्र क्रमांक 676 लागून असता शेतकऱ्यांनी आपल्या शेत पाणी करायला जात असताना त्या शेतकऱ्यावर अस्वलीने जोराचा हल्ला करून शेतकऱ्यांना जखमी केले. सदर माहिती वनविभागांना मिळतात त्याच क्षणी वनविभागाचे कर्मचारी व वनमजूर घटनास्थळी उपस्थित झाले.

 त्याच उपस्थितीत उपशेत्र सहायक अधिकारी. श्री नंदकिशोर पडवे व वनरक्षक बेंदले मॅडम व त्यांचे वनमजूर किशोर गेडाम निखिल आलाम किशोर मडावी व गावातील उपसरपंच अतुल बुरांडे घटनास्थळी उपस्थित होते. सदर माहिती मिळताच इसमाला ग्रामीण शासकीय रुग्णालय मूल येथे उपचाराकरिता नेण्यात आले.

 उपचार दरम्यान सदर केस शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. तसेच त्या इस्माला आर्थिक मदत त्या वनविभागाचे कर्मचारी तात्काळ रुपये ५००० व खाजगी गाडी भाडे २००० रुपये तात्काळ मदत देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत