मोकाट जनावरांचा ठिय्या भररस्त्यात मध्यभागी बसत असल्याने वाहतुकीस अडथळा
मोकाट जनावरांचा ठिय्या भररस्त्यात मध्यभागी बसत असल्याने वाहतुकीस अडथळा
अपघात होण्याची शक्यता,
नगर परिषद या बाबींची दखल घेईल का ?
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,अश्वजित हूमने,ब्रम्हपुरी : राज्य महामार्गावर मोकाट जनावरांचा आजकाल ठिय्या पाहायला मिळतोय. भररस्त्यात मध्यभागी जनावर विळखा घालून बसलेले असतात. याकरणाने महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होताना दिसून येतोय.त्यातच जनावरं वाहनांच्या आवाजाने ये जा करणाऱ्या लोकांच्या अंगावर धाऊन येणार याची शास्वती देता येत नाही.
ब्रम्हपुरी शहरातील खरिस्तानंद चौक आणि खोब्रागडे चौक या ठिकाणी नेहमी जनावरांची बैठक पाहायला मिळत आहे. खरे पाहता नगर परिषदेने या बाबतीत दखल घ्यायला हवी परंतु हा विषय त्यांना फारसा तेवढा महत्वाचा वाटतं नाही. खोब्रागडे चौक येथून ब्रम्हपुरीचे मुख्यधिकारी याच मार्गाने रोज नगरपरिषद ऑफिस ला ये जा करतात परंतु या बाबीकडे त्यांचेही लक्ष्य वेधले गेले नसणार का ?
हा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे व नागरिकांमध्ये या बाबतीत चर्चा सुरू आहे एखादा अपघाात होईल त्या वेळेस प्रशासनाचे डोळे उघडणार का असे चित्र निर्माण झालेले दिसून येत आहे जनावरांची संख्या वाढत आहे आणि जनावरे नेहमीच रोडवर दिसून येतात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत