मा. मुख्यमंत्री शिंदेचे ज्वलंत हिंदूंचे विचार ऐकण्यासाठी झरी जामानी तालुक्यातून 300 शिवसैनिक जाणार मुबईत होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला
मोरेश्वर सरोदे,बाळू चेडे ,जीवन उलमाले राहुल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 300 शिंदे चे शिवसैनिक जाणार दसऱ्या मेळाव्यात
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,यवतमाळ : सध्या गाजत असलेल्या शिवसेनाच्या दसरा मेळाव्याचे पडसाद चांगलेच उमटत आहे, यातच शिंदे गटात गेलेल्या काही पद अधिकाऱ्यांनी झरी जामनी तालुक्यातील शेकडो शिवसैनिक घेऊन मुंबई वारी करण्याचे ठरवले आहे.
सध्या तरी 300 शिवसैनिक महाराष्ट्रच्या शेवटच्या आदिवासी बहुल झरी-जामनी तालुक्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. आता एका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याला नाराज असलेले संपूर्ण शिंदे शिवसैनिक मुंबई वारी करणार, हे सर्वश्रुत आहे. सध्या शिवसेनेत बंडाळी झाली आहे.
शिंदे हे दसरा मेळावा बिकेसी मैदानात घेत आहे, प्रत्येक तालुक्यात वाहनांची सोया केली आहे. आता छोट्या दुर्गम तालुक्यातुन जवळपास 300 कार्यकर्ते जाणार आहे. यात शेकडो कार्यकर्ते तर चक्क उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तालुक्या अध्यक्ष याच्या गावातून जास्तीत जास्त शिंदे सैनिक जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण जाणाऱ्या कार्यकर्त्यात्यामुळे झरी तालुक्यात सुद्धा उभी फूट पडल्याचे दिसत आहे, एकट्या मुकुटंबन-पांढरकवडा-कोसारा- अडेगाव गणातून 200 कार्यकर्त्यांची फौज मुंबईच्या मुख्यमंत्री याच्या दसरा मेळाव्यात जाणार आहे. तालुक्यातील मोरेश्वर सरोदे,बाळू चेडे, जीवन उलमाले,राहुल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक मुंबई कडे मंगळवारी प्रस्तान करणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत