Breaking News

2012 पूर्वीचे अतिक्रमण धारकांना पट्टे द्या :-वंचित बहुजन आघाडीची मागणी

 2012 पूर्वीचे अतिक्रमण धारकांना पट्टे द्या :-वंचित बहुजन आघाडीची मागणी 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : संपूर्ण साकोली तालुक्यात गोरगरीब लोक आहेत काम बरोबर मिळत नाही, बेकारी वाढलेली आहे, आणि सरकारची योजना आहे, भारतीय राज्य घटनेत अन्न, वस्त्र, निवारा देने ही सरकारची जवाबदारी आहे. प्रत्येक गावात गोरगरीब लोक आहेत, त्यांना घर नसल्यामुळे अतिक्रमण करून घर बांधलेले आहे. आणि दहा दहा - वीस वर्षे झालेले आहेत, तरीसुद्धा त्यांना पट्टी मिळाले नाही, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या साकोली तर्फे 2012 पूर्वीचे अतिक्रमण धारक जे लोक आहेत. त्यांना पट्टे देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा साकोलीने केलेली आहे. एसडी ओ मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

 निवेदन देता प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा निरीक्षक सुनिता टेंभुर्ण, भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी ,यादोराव गणवीर, तालुका महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, तालुका सचिव अमित नागदेवे ,गणेश गजभिये,शहर अध्यक्ष प्रा रोशन भोवते ,तालुका महिला सचिव शीतल नागदेवें, शहर महिला अध्यक्ष स्वर्णमाला गजभिये उपस्थित होते व अनेक कार्यकर्ते चे निवेदनावर सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत