वरोऱ्यातील बाजारात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर
प्रशासन सुस्त, प्लास्टिक मस्त
वरोऱ्यातील बाजारात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर
शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमाचा फज्जा !
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : 14 फेब्रुवारी 2019 ला राज्य सरकारने सर्व राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू केल्याची घोषणा केली. परंतु वरोरा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक चा वापर होत आहे.दुकानातील वस्तू ह्या प्लास्टिक मधून देत आहे.त्यामुळे आरोग्याला व पर्यावरणाला हानी पोहचण्याची शक्यता बळावली आहे.
प्रशासन सुस्त तर प्लास्टिक मस्त असे म्हणणे वावगे ठरणार नाही.सर्रासपणे बाजारात प्लास्टिक विक्री सुरू असतांना शासन -प्रशासन डोळेझाक का करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकंदरीत छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक बंदी नियमाचा फज्जा उडतांना दिसतो आहे.प्रशासनाने प्लास्टिक वापर करणाऱ्या व्यापारी-दुकांनदारांवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
14 फेब्रुवारी 2019 ला राज्य सरकारने सर्व राज्यभरात देशात प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी नियमाची घोषणा केली आहे.कचरा एक मोठी समस्या आहे ती पर्यावरणाला हानी आणि शहराला विद्रुप करण्याचे काम करते.प्लास्टिक चा कचरा नष्ट करणे शक्य नसल्याने दिवसेंदिवस प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग वाढत आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणामध्ये होत असलेल्या निसर्गाचा ऱ्हास आणि हानी त्यापासून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे सरकारने राज्यात प्लास्टिक बंदी तातडीने केली आहे.तसेच प्लास्टिक वापर कर्त्यांकडून पाच हजार रु दंड सुद्धा वसूल करण्यात येईल अशी सरकारने घोषणा केली.परंतु व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करीत असतांना दिसून येत आहे.प्रशासन डोळेझाक का करीत आहे हे एक कोडेच आहे.बाजारपेठेत सर्रासपणे प्लास्टिक वापर सुरू असून प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत