शिवश्री दिनेश कदम यांची मराठा सेवा संघ प्रणित वस्तीगृह कक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड
शिवश्री दिनेश कदम यांची मराठा सेवा संघ प्रणित वस्तीगृह कक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : मुक्ताईनगर येथील रहिवासी शिवश्री दिनेश कदम यांची मराठा सेवा संघ सोबत सामाजिक कार्य करत त्यांचा उत्साह व जनसंपर्क लक्षात घेत शिवश्री कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, भारत गणराज्य) व शिवश्री सुनील महाजन (राष्ट्रीय अध्यक्ष ,मराठा वस्तीगृह कक्ष) यांनी मराठा सेवा संघ प्रणीत वस्तीगृह पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदी त्यांची निवड केली.
शिवश्री दिनेश कदम यांचा मराठा सेवा संघा सोबत 1997 पासून कार्यकर्ता म्हणून प्रवास आहे. या प्रवासामध्ये कार्यकर्ता शाखाप्रमुख ,तालुकाप्रमुख जिल्हा उपप्रमुख, तसेच महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख असा राहिलेला आहे. सतत सामूहिक विवाह व शिवधर्म परिषद व बळीराजा शिवगौरव सप्ताह,जिल्हा भरात प्रवक्त्यांच्या जाहीर सभा घेणे, कार्यकर्ता असताना आपले कार्यकर्ते नाही आपले मित्र आहे असे म्हणणारे दिनेश कदम यांची वेगळीच ख्याती आहे.
त्यांचा विविध सामाजिक संघटनाशी स्नेहसंबंध कायम आहे.तसेच त्यांचा उच्च पदस्थ अधिकार्याशी वैचारिक संबंध असून कामाचा प्रचंड आवाका असणारे अशी एक ओळख आहे.त्यामुळे परिपक्व अशा कार्यकर्तेला राष्ट्रीय स्तरावर प्रमुख जबाबदारी मिळाली ही फार मोठी आनंददायी बाब आहे.त्यांना अनेकदा वेगवेगळ्या जबाबदारी सोपविण्याची विनंती केली परंतु त्यांनी नाकारली.निश्चितपणे आदरणीय शिवश्री सुनिल महाजन साहेबांना मजबूत साथीदार मिळाला.अशा सर्वांच्या आवडत्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन सर्व मित्र मंडळी,राजकिय वर्तुळ,अधिकारी वर्ग व सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत