तेलंगणा राज्यातील बतुकम्मा चे सुबई येथे जल्लोषात स्वागत
तेलंगणा राज्यातील बतुकम्मा चे सुबई येथे जल्लोषात स्वागत
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,राजुरा : तेलंगणा राज्यात नवरात्रात खेळल्या जाणाऱ्या बतुकम्मा कार्यक्रमाचे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवरील राजुरा तालुक्यातील सुबई या गावात मोठ्या जल्लोषात नवरात्रातील शेवटच्या दिवशी ( दि.३) सांगता करण्यात आली.
सुबई या गावात तेलुगु भाषिक लोकांची पन्नास टक्के इतक्या संख्येत वस्ती असल्याने महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यातील सण उत्सवाला वाव मिळतो यामुळे तेलंगणा राज्यात राजकीय उत्सव मानल्या जाणाऱ्या बतुकम्मा हा उत्सव सुबई येथे 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर असे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
या उत्सवाला झाडांची रंगीबेरंगी फुले गोळा करून बतूकम्मा तयार केली जाते गावातील मुख्य चौकात आणून महिला महाराष्ट्रातील दांडिया प्रमाणे गाण्याच्या तालावर नृत्य करतात, हा कार्यक्रम नवरात्रात सतत नऊ दिवस खेळल्या जातो, शेवटच्या दिवशी सासरी गेलेल्या मुलीला आई वडील माहेरी बोलावून घेतात. सर्व तेलगु भाषिक महिला घरोघरी रंगीबेरंगी फुलांची बतुकम्मा तयार करून, शारदा सार्वजनिक महिला मंडळाच्या ठिकाणी गावातील मुख्य चौकात आणून त्याची पूजा करून बतुकम्मा च्या गाण्यावर रात्रभर नृत्य केली.
यामध्ये मराठी भाषिक महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या व दुसऱ्या दिवशी सकाळी बतूकम्मा ची पूजा करून गावातील तळ्यात विसर्जन केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील शारदा सार्वजनिक महिला मंडळाच्या महिला, प्रतिष्टीत नागरिक, युवक वर्ग, शंकर सत्रे अध्यक्ष, त मु समिती, तसेच गावातील सर्व नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत