Breaking News

पुरातन काळापासून चालत असलेल्या मंदिरात भक्तांची गर्दी

 सेलूत नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

 शहरातील पुरातन काळापासून चालत असलेल्या मंदिरात भक्तांची गर्दी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : शहरातील विविध भागात नवरात्र महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे. या वर्षांत गरबा महोत्सवात जुन्या रितीरिवाजा नुसार आराधी विडा, भजन किर्तन, पारंपरिक नृत्य, स्पर्धा याला आयोकांनी फाटा दिला आहे,तरि पण मळ्यातील आदिमाया तुळजा भवानी महोत्सव, शेरे गल्लीत जगदंबा संस्थान, हुतात्मा चौकातील महालक्ष्मी मंदिर, मठ गल्लीत प्रकाशसिंग ठाकूर यांनी स्थापन केलेल्या

जय भवानी नवरात्र महोत्सव येथील ४९ वर्षाची परंपरा कायम, आशोक खताळ यांनी स्थापन केलेल्या अहिल्या नगरात वाघेश्वरी नवरात्र महोत्सव २८ वर्षांची परंपरा कायम ठेवत नवरात्र महोत्सव साजरा होत आहे तसेच शहरातील विविध भागात नवरात्र महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे, दररोज सायंकाळी आरतीला ठिक ठिकाणी पारंपरिक वाद्या झांज, संबळ यांच्या तालावर आरती केल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत