Breaking News

ठेकेदार हरविल्यामुळे टाकीचे काम बंद

 ठेकेदार हरविल्यामुळे टाकीचे काम बंद

 वरोरा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा -पाण्याची तीव्र समस्या

छोटुभाईच्या तक्रारीची दखल घेत, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्याधिकार्याना दिल्या चौकशी व कार्यवाहिच्या सूचना

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : वरोरा नगरपरिषद चे उपजिल्हा रुग्णालयाचे बाजूला 1972 मध्ये बनविलेली जुनी जीर्ण असलेली 6 लाख लिटर क्षमतेची पाणी टाकीवरून एक दिवसाआड अपुरा पाणीपुरवठा शहराला होत असतो. शहरातील चिरघर प्लॉट ,रेल्वे स्टेशन , माढेली नाका परिसर ते बाजार परिसर जवळपास 60 टक्के वसाहतीमध्ये टाकी द्वारा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शहरात वर्धा नदीवरून येणारे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होत असल्याने न.प.चे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ता छोटुभाऊ शेख यांनी सामाजिक सेवेचे दायित्व स्वीकारून आमदार प्रतिभा धानोरकर व नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन वजा तक्रार सादर केली .

   वर्धा नदीत पाणी असतांना सुद्धा पावसाळ्यात व हिवाळ्यात पाणी टंचाई होत आहे.सदर समस्या लक्षात घेत दोन वर्षांपूर्वी वशिष्ठ पूर्ण निधी अंतर्गत नगरपालिकेने टाकी बांधकाम व इतर कामाकरिता 1 कोटी 98 लाख रुपये मंजूर करून कामाच्या ई-निविदा काढल्या होत्या.त्यानुसार सदर काम साईनाथ कन्स्ट्रक्शन अमरावती यांना मिळाले असून कामाचे आदेश यांना 8 -4-2021 ला दिले,आणि 12 महिन्याचे आत सदर टाकीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा टाकीवरून करणे या कालावधीत करणे बंधनकारक होते.ठेकेदारांच्या चुकीच्या धोरणामुळे कामाच्या कालावधीपेक्षा 6 महिने जास्त होऊन सुद्धा नाही च्या व्यतिरिक्त निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केल्याचे दाखवून 7 ते 8 लाख रुपये बिल सुद्धा ठेकेदाराने उचलले असल्याचा आरोप न.प.चे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ता छोटुभाई शेख यांनी केला आहे.

  सदर कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष व ठेकेदारांची इच्छा शक्ती नसल्याने दीड वर्ष होऊन सुद्धा नागरिकांना नाहीच्या बराबरीत नदीचे पाणी मिळत असल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण होऊन हजारो गोरगरीब नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचें काम ठेकेदाराने केल्यामुळे वर्षभरात तीन लेखी व अनेकवेळा तोंडी तक्रार करून सुद्धा कार्यवाही झाली नसल्याने सदर ठेकेदारावर 27-12-2021 च्या सर्वसाधारण सभेच्या मंजूर ठरावानुसार कामाची मुदत संपलेल्या दिवसापासून प्रति दिवस हजार रुपये दंड आकारणी करून जवळपास 1 लाख 50 ते 60 हजार न.प.फंडात भरण्याकरिता आदेश देण्यात यावा व तसेच सदर काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रति दिवस 1 हजार रुपये दंड आकारणी घेऊन 6 महिन्याचे आत टाकीचे काम पूर्ण करण्याकरिता लेखी स्वरूपात करारनामा तयार करावा त्या व्यतिरिक्त काम होत नसल्यास सदर कामाच्या फेरनिविदा काढून 6 महिन्याचे आत काम पूर्ण करण्याची कार्यवाही करा याकरिता ठेकेदाराचे निषेध करण्याकरिता कामाच्या परिसरात ठेकेदार हरविल्यामुळे काम बंद असल्याने ठेकेदारावर कारवाही करा असे फलक नागरिक व माजी सभापती छोटुभाई शेख यांनी लावले आहे.

  सदर प्रकरणाची दखल घेत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्याधिकारी याना पत्र पाठवून सदर कामाची चौकशी करून काम वेळेच्या आत होण्याकरिता ठेकेदारावर कार्यवाही करा असे निर्देश दिले आहे.कारवाही न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा माजी सभापती तथा प्रदेश महासचिव काँग्रेस कामगार विभाग छोटुभाई शेख यांनी न.प.प्रशासनाला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत