तहसिलदार मीना निंबाळकर यानां "आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर पुरस्कार"
राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यानां "आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर पुरस्कार"
गोव्याचे माजी मूख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते प्रदान
महा घडामोडी न्युज नेटवर्क,कोल्हापूर : राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार 'मीना निंबाळकर यांना आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर पूरस्कार आज प्रधान करण्यात आला.माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, शिक्षण प्रसारक मंडळ रायबाग अध्यक्ष अमरसिंह पाटील, आमदार निलेश लंके, माजी आमदार संजय पाटील, माजी खासदार आनंदराव अडसूळ, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), राजारामबापू पाटील साखर कारखाना, इस्लामपूरचे चेअरमन पी. आर. पाटील आदींसह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
समारंभापूर्वी पुरस्कार प्राप्त तहसिलदार मीना निंबाळकर यांचा फेटा बांधून, हलगीच्या ठेक्यावर, पारंपरिक वाद्यांच्या गजरात, तुतारी वादनाने जल्लोषात स्वागत करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव (कर्नाटक) येथील अशोक नगरमधील धर्मनाथ भवनमध्ये शनिवारी ( दि. ८ ऑक्टोबर २०२२) रोजी सकाळी १२ ते ३ या वेळेत पार पडला. यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते, मठाधीश, पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नातेवाईक, चंद्र गावातील बी. एस. पाटील यांचे हितचिंतक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत