सन मेघा प्रा.ली.कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राची चौकशी करा
सन मेघा प्रा.ली.कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राची चौकशी करा
प्रहार जिल्हा महासचिव जयेंद्र देशपांडे यांची मागणी
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम, भंडारा : केंद्र व महाराष्ट्र शासन संचालित पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना चालविली जात असून सन मेघ व्हेंचर प्रा.ली.या कंपनीला त्या प्रशिक्षण संचालनाचा कार्य देण्यात आलं होतं त्या करिता जानेवारी 2022 मध्ये प्रशिक्षण केंद्र महर्षी विद्या मंदिर येथे कार्यान्वित केले असून या प्रशिक्षनाला 3 जिल्हे प्रशिक्षणाला दिले आहेत..यात भंडारा,गोंदीया,गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील बीपीएल धारकांना मनरेगा अंतर्गत मोडणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येते.
ही प्रक्रिया तीन महिन्याची असून त्यानंतर प्रशिक्षकांना नोकरी प्लेसमेंट देण्यात येते.मात्र असे न करता कंपनीने प्रशिक्षणार्थ्याची दिशाभूल करून सोयी-सुविधा दिल्या नसून उडवा उडवी चे उत्तर दिल्याच्या आरोप प्रशिक्षणार्थी व प्रहार चे संघटनेने केले आहे.त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व डीआरडीओ येथे सोपविण्यात आले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी धीरज गोस्वामी, सुरज रामटेके, रितिक शेंडे, प्रमोद ठाकरे ,रामेश्वर साठवणे ,करण लोणारे, महेश शेलोकर श्रीकांत वाढई,बाबुल तवाडे, पिंटू ब्राह्मणकर, राजेश डूंभरे, सोपान झलके, सतीश कावळे,राजेश मेश्राम, गणेश भांडारकर आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत