Breaking News

सांगलीकरांसाठी एन.पी.फिश कंपनीतर्फे बंगडा मासा मोफत

 सांगलीकरांसाठी एन.पी.फिश कंपनीतर्फे बंगडा मासा मोफत 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सांगली : येथील शिवशंभो चौक कर्नाळ रोड नजीक नव्याने चालू झालेल्या एन. पी. फिश कंपनीतर्फे एका ग्राहकास १ किलो मासे मोफत देण्यात आले. या कंपनीच्या कराड, इस्लामपूर येथे शाखा आहेत. साधारण या मासे व्यवसायात तिसरी पिढी काम करत आहे. या व्यवसायात अजित पाटील व सुनील पाटील या बंधूनी मराठी लोकं व्यवसाय करू शकतात हे दाखवून दिले आहे. 

सध्या त्यांनी सांगलीतील मासे खवय्येकरांसाठी समुद्रातील ताजे मासे सांगलीतील त्यांचे मित्र व व्यवसाय पार्टनर इकलास रियाज बारगीर यांच्या मदतीने शिवशंभो चौक कर्नाळ रोड येथे एन. पी. फिश कंपनी शाखा सांगली चालू केली आहे. या फिश कंपनीमध्ये रत्नागिरी येथून समुद्राचे पापलेट, सुरमई, रावस, हलवा यासारखे अनेक प्रकारचे मासे आणले जातात. तसेच बाजारी भावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. अगदी अल्फावाढीतच यांनी सांगलीमध्ये आपले बसथान बसवले आहे. 

           दिनांक ३ ऑक्टोबर रोजी तर कंपनी सांगलीकरांसाठी अनोखी ऑफर घेऊन आली होती. यांनी व्यवसायातील सर्व बंधने तोडून सांगलीकरांसाठी १ किलो बंगडा मासे फ्री दिले. देताना अट एवढीच की, त्यांच्या वॉट्सअँप ग्रुपवरती सामील व्हायचे. या त्यांच्या ऑफरला सांगलीतील मासे खवय्ये प्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी एन. पी. फिश कंपनी सांगलीचे मालक इकलास रियाज बरगीर यांनी आम्ही मासे बाजारानुसार अशाच वेगवेगळ्या ऑफर घेऊन येणार असल्याचे आश्वासन सांगलीकरांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत