माजी नगरसेवक शंकर वाकोडे यांच्या स्मृतीदिनी 50 युवकांनी केले रक्तदान,
माजी नगरसेवक शंकर वाकोडे यांच्या स्मृतीदिनी 50 युवकांनी केले रक्तदान,
रघुवीर अहीर यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : भाजपाचे माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय शंकर गो. वाकोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चंडीका माता मंदीर समिती महाकाली वार्ड चंद्रपूर च्या वतीने दि. 03 ऑक्टोबर 2022 रोजी चंडीका माता मंदीरासमोर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या शुभहस्ते पार पडले. या रक्तदान शिबिरात युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करुन स्वर्गीय वाकोडे यांच्या समाजाभिमुख कार्याला आदरांजली वाहिली.. या शिबिराला पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सदिच्छा भेट देवून रक्तदात्यांच्या सन्मान केला व त्यांना टी-शर्ट चे वितरण केले.
रघुवीर अहीर यांनी या रक्तदान शिबिराच्या आयोजनातून शंकर वाकोडे यांनी सामाजिक स्तरावर केलेल्या उल्लेखणीय कार्याला एक प्रकारे श्रध्दांजलीच असल्याचे सांगितले त्यांनी गोरगरीब लोकांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला असल्याने त्यांच्या या समाजाभिमुख कार्याचा दरवळ सदैव स्मरणात राहण्यासाठी समितीच्या माध्यमातून योगदान देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास भाजपा जिल्हा महामंत्री राजेश मुन, खुशाल बोंडे, माजी नगरसेविका सुनिता वाकोडे, रवि धारणे, माजी नगरसेविका वंदना भागवत, पुनम तिवारी, गौतम यादव, हिरालाल ठाकुर, अशो सोनी, संतोष तिवारी, अनुज सोनी, क्रिष्टी परेरा, कुणाल हेलवडे, सावन भोयर, आशिष चव्हाण, पियुश गिरडकर, सत्यम मिर्धा, रोहीत ओगले, जितेंद्र ठाकुर, स्वप्निल सोनकुसरे, मंगेश मेंढे, रोहीत ओगले, नरेंद्र यादव, राखी वाकोडे, चंदू उपाध्याय, अनिकेत पोतराजे, दिपक जीवने, अनुप पांडे, शाबज शेख, अनिकेत जांभुळकर आदींची उपस्थिती होती. या शिबिरात पन्नासहुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यात योगदान दिले. सर्व रक्तदात्यांचे राजेश वाकोडे, गणेश वाकोडे, शिवाजी वाकोडे व रवि वाकोडे यांनी आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत