आबासाहेब टरपले यांनी पुणे शहरात राहत असलेल्या मराठवाड्यातल्या बांधवांची घेतली भेट
आबासाहेब टरपले यांनी पुणे शहरात राहत असलेल्या मराठवाड्यातल्या बांधवांची घेतली भेट
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सूरज शहाणे, सेलू : मराठवाडा सामाजिक फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री.आबासाहेब टरपले यांनी मराठवाड्यातील पुणे शहरात राहत असलेल्या बांधवांशी संपर्क साधुन त्यांच्या अडी- अडचणी जाणुन घेतल्या. मराठवाड्यातुन बऱ्याच संख्येने लोक पुणे शहरांमध्ये काम,धंद्यासाठी ,उद्योगासाठी , नोकरीसाठी, पुणे शहरात वास्तव्यास आहेत. परंतु एखादा व्यक्ती खेड्यातुन नविनच कामासाठी आल्यानंतर त्याच्या हाताला लवकर काम मिळत नाही.आणि काम मिळाले तर राहायला घर मिळत नाही. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही. अशा बरेच काही अडी- अडचणी जाणुन घेतल्या. त्यामुळे एकमेकांस साह्य करणे सामाजिक कार्य करणे व सामाजिक बांधीलकी जपणे व व्यवसाय करणे व संघटन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले पुणे शहरातील सांगवी,पिंपळे गुरव,बालेवाडी, बाणेर, वाघोली येथील बांधवांना त्यांनी भेट दिली. श्री.नारायण पितळे ,संतोष गटकळ,अर्जुन कवळे, गणेश खटिंग, एकनाथ आवटे,विजय लाटे, कैलास कणसे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत