स्वातंत्र्यवीर योद्धा हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न!
स्वातंत्र्यवीर योद्धा हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न!
महा घडामोडी न्युज नेटवर्क, माहूर : प्रथम स्वातंत्र्य सेनानी वीर योद्धा हजरत टिपू सुलतान यांच्या २७२ व्या जयंती दिनानिमित्त माहूर येथील मानव कल्याणासाठी कार्य करणाऱ्या राहत ग्रुप तर्फे (वर्ष दुसरे) आज (ता.२०) रोजी माहूर शहरातील टिपू सुलतान चौक मधील अब्बू फंक्शन हॉल मध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समुदायातील ५७ युवक रक्त दात्यांनी रक्तदान करून या शिबिराला चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती राहत ग्रुपचे आजीम सय्यद यांनी दिली.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार कारण नसताना एखाद्या माणसाचा खून करणे ते संपूर्ण मानवतेचा खून केल्यासारखे असून त्या तुलनेत एकाद्या माणसाचा जीव वाचवणे म्हणजे संपूर्ण मानवतेच जीव वाचण्याची शिकवण देते कुणाला रक्त देणे त्याला आयुष्य देण्यासारखे आहे, असे म्हटले आहे. या शिकवणीनुसार मिसाईल मॅन हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त शहरातील युवकांनी एक स्तुत्य पूर्ण उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.यात डीजे,मिरवणूक सारख्या कार्यक्रमासाठी अनाठायी खर्च करण्यापेक्षा सध्या निकडीची गरज असलेले रक्तदान शिबिर आयोजित करून गरजू रुग्णांची गरज भागवण्याचा उदांत हेतू साध्य केल्याने राहत ग्रुपचे तरुण व तडफदार कार्यकर्ते आजीम सय्यद,निसार कुरेशी, नजीर शेख,मोईन खान,अल्ताफ इफ्तेखर,मुदासिर खान,इम्रान,असिफ खं वाई, मसूद सौदागर,मुस्ताक, सह इतर सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.दि क्रिसेंट ब्लड सेंटर नांदेड या रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी शिबिराला शहरातील व समाजातील विविध मान्यवरांनी भेट दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत