बोदवड येथे गावठी दारूअड्ड्यावर धाड
बोदवड येथे गावठी दारूअड्ड्यावर धाड
दहा हजार आठशे रु चा मुद्देमाल नष्ट
महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी, चेतन तायडे. जळगाव : बोदवड शिवारातील राधेश्याम वर्मा यांचे शेताजवळील नाल्यात गावठी दारू बनवली जात असल्याची माहिती मिळाली असता आज सकाळी सात वाजेच्या सुमारास बोदवड पोलिसांनी धाड टाकून श २ ड्रम कच्चे व गरम ४०० लिटर रसायन चालू भट्टी व ६९ लिटर तयार हात भट्टी वरील तयार दारू सह १०८०० रुचा मुद्देमाल नष्ट केला.
ही दारू पाडणारा संतोष लालजी मोरे वय ५२ रा. भिलवाडा बोदवड हा पोलीस येण्याचा सुगावा लागताच फरार झाला असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम६५ ब,क, फ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गावठी दारू बाबत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली असून बोदवड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव,हे.कॉ .वसंत निकम ,हे.कॉ. संतोष चौधरी पो.ना. तुषार इंगळे ,पो.कॉ.दीपक पाटील ,मुकेश पाटील यांनी ही कारवाई केली या प्रकरणी पुढील तपास पो. ना. युनूस तडवी करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत