ग्रामसेवकाच्या गैरव्यवहार चौकशीसाठी ग्रा.पं. सदस्याचे आमरण उपोषण
ग्रामसेवकाच्या गैरव्यवहार चौकशीसाठी ग्रा.पं. सदस्याचे आमरण उपोषण
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गजानन बावस्कर, बोदवड : बोदवड तालुक्यातील कंरजी पाचदेवळी गट ग्रामपंचायत अंतर्गत मागासवर्गीय वस्तीतील कामे ग्रामसेवक बोगस ठेकेदारांकडून करून घेत आहेत.तसेच ई निविदा रद्द करण्या बाबत ग्रामपंचायत चा ठराव असुन सुध्दा ग्रामसेवक गोविंद राठोड मनमानी करत असल्याने त्यांची बदली करणे व मागासवर्गीय वस्ती रस्ता आणि गटार या निकृष्ट कामाच्या चौकशी साठी ग्रामपंचायत सदस्य उत्तम सुरवाडे यांनी २३ नोव्हेंबर पासुन बोदवड पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायत सदस्य सुरवाडे यांनी ग्रामसेवक गोविंद राठोड याच्याकडे तोंडी व लेखी तक्रारी करून सुध्दा ते ग्रामपंचायत मधील कामा संदर्भात तसेच कामांची अंदाजपत्रके ,प्रशासकीय मान्यता या सबंधी कोणतीही माहिती ग्रामपंचायत सदस्य असूनसुद्धा देत नाही तसेच १४ व १५ वित्त आयोग निधी आज पर्यंत संपुर्ण खर्च केला नाही.तसेच यातील काही निधी कामांचे कोणतेही अंदाज पत्र मान्यता न घेता ग्रामसेवक व सरपंच यांनी परस्पर काढुन घेतला आहे .मागासवर्गीय निधी सुध्दा खर्च करण्यात आलेला नाही .सदर ग्रामसेवक यांच्या कडे पाच ग्रामपंचायत अतिरिक्त कार्यभार असल्याने कंरजी ग्रामपंचायत कामकाजात कडे पुरेसे लक्ष देत नाही .
मागासवर्गीय वस्तीचे काम एक वर्ष प्रलंबित असलेल्या तसेच सदर ई निविदा रद्द करण्या बाबत लेखी तक्रारी ग्रामपंचायत च्या असुन सुध्दा संबंधित ठेकेदाराला काम देण्या बाबत ग्रामसेवक व गटविकास अधिकारी याचा कल दिसुन येत आहे .सदर निधी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी याच्या सहीने ठेकेदारांना दिला जातो म्हणून हे दोघेही जबाबदार आहेत. हे काम करणाऱ्या ठेकेदार चौकशी करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे याआधी दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने आधी दिलेल्या पत्रा नुसार ग्रामपंचायत सदस्य सुरवाडे यांनी आज पासून आमरण उपोषणास आज सकाळी 11 पासून सुरवात केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत