Breaking News

एकमेव गाव आनंदाच्या शिधा पासून वंचित रावेर तालुक्यात रेशन वितरण व्यवस्थेत महाघोटाळा

 महाराष्ट्रातील एकमेव गाव आनंदाच्या शिधा पासून वंचित रावेर तालुक्यात रेशन वितरण व्यवस्थेत महाघोटाळा 

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर, जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या बलवाडी तालुका रावेर येथील रेशन दुकानात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी साजरी व्हावी म्हणून राज्यातील सर्व कार्डधारक यांना आनंदाच्या शिधा किट वाटप करण्याची घोषणा करून या किटमध्ये रवा चना डाळ साखर पामतेल याप्रमाणे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिवाळी किटचे वाटप केलेले आहे परंतु वाटप करताना हे किट ऑनलाईन पद्धतीने वाटप करताना सर्वर डाऊन झाल्याने वाटप हे ऑनलाईन होत नसल्याने मुख्यमंत्री यांनी राज्याचे पुरवठा सचिव यांना आनंदाचा शिधावाटप हे ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्यासाठी दुकानदार यांना आदेश करावे असे आदेश करण्याचे आव्हान केले.

 त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात दुकानदार यांनी झाले तर ऑनलाईन नाही झाले तर ऑफलाईन वाटप केले परंतु राज्यात एकमेव गाव ते म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बलवाडी गावात शासकीय धान्य गोदामातून एक किट म्हणजेच रवा चनाडाल साखर पामतेल असे सर्व बलवाडी गावातील दुकानदार यांना दिवाळीतच वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात आलेले असून सुद्धा तसेच एक महिना कालावधी होऊन सुद्धा हे किट दुकानदार यांनी वाटप केलेले नाही लाभधारकांना दिवाळीच्या आनंदाचा शिधा किट पासून वंचित ठेवल्याने याबाबत येथील सरपंच विनायक पाटील व दक्षता समितीचे सदस्य तसेच गावातील तमान कार्डधारक यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच पुरवठा मंत्री जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ऑनलाइन तक्रार केल्याने रावेर तालुका तहसीलदार देवगुणे मॅडम व रावेर पुरवठा निरीक्षक डी के पाटील यांनी बलवाडी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून दुकानाचा स्टॉक हा पंचाचे समक्ष तपासणी केली असता गोदामातून प्राप्त झालेले आनंदाचा शिधा किट जसेच्या तसे च स्टॉक मध्ये आढळून आले आहे.

 याबाबतची अधिक चौकशी करण्यात आली असता गावातील कार्डधारक यांचे पुरवठा अधिकारी यांनी लेखी जॉब जवाब घेतले असून पंचनामा केला आहे आनंदाचा शिधा किट दिवाळी होऊन महिना उलटूनही मिळालेले नसल्याने कार्डधारक यांनी जवाब नोंदवून दिला आहे मुख्यमंत्री यांनी ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्याची मुभा दिली असताना एक महिन्याचा कालावधी संपूनही वाटप का करण्यात आले नाही कार्डधारक यांना शासकीय योजनेचा लाभापासून का वंचित ठेवले याबाबत त्या दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी सर्वत्र मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत