महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने 26/11 च्या मुंबई हमल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने 26/11 च्या मुंबई हमल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण
राजुरा येथील संविधान चौकातुन कँडल मार्च काढण्यात आली
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सुभाष अलगमकर, राजुरा : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या हमला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो या घटनेला आज चौदा वर्ष पूर्ण झाली असून या हमल्यात 106 पेक्षा अधिक लोक मरण पावले तर 360 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आणि या हमल्यात दहशतवाद्यांशी लढतांना वीर मरण पत्करलेल्या मुंबई पोलीस जवानांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष तथा संस्थापक. राहुल भाऊ दुबाले यांच्या. मार्गदर्शनात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष. परमेश्वर बळीराम चव्हाण यांच्या नेतृत्वात राजुरा येथील संविधान चौकात श्रद्धांजली वाहिली तसेच राजुरा येथील पंचायत समिती ते तहसील कार्यालय पर्यंत कँडल मार्च काढण्यात आले.
पोलीस शिपाया पासून ते पोलीस अधिका-या पर्यंत लोक सेवेसाठी रात्रंदिवस मेहनत घेतात, पोलीस दलात कार्यरत असणारे आपले पोलीस बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा मंच नसल्यामुळे वर्षानुवर्षांपासून त्यांच्या समस्या जैसे थेच आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासा ठी हक्काच्या मंच तयार व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य मा. राहुल दुबाले सर यांनी पोलीस बाईज संघ टनेची स्थापना केली. संघटने मध्ये जास्तीत जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईकाना घेण्याचा प्रयत्न करित आहे. जेणे करून घर ते पोलीस कार्यालयातल्या छोट्यातल्या छोट्या समस्यांना जाणुन घेऊन शासन, प्रशासन दरबारी मांडता याव्यात यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये शहीद जवानांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली कार्यक्रम व मशाल रॅलीचे आयोजन करत आलेली आहे.यासाठीच आज शहीदांना श्रध्दांजली देण्याकरीता २६ नोव्हेंबरला जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
ही संघटना एकुण ३२ जिल्ह्यात कार्यरत असुन संस्थापक अध्यक्ष मा राहुल दुबळे सरांनी चंद्रपूर जिल्ह्यात कार्यकारिणी गठीत केली आहे.याप्रसंगी छत्रपती शिवाजी अकॅडमी राजुरा चे अध्यक्ष तथा संस्थापक शेख सर, अकॅडमीचे सचिव सौ. योगिता मॅडम, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर चव्हाण. जिल्हा सहसचिव दीपेश वनकर, संजय गो राठोड .राजुरा तालुका उपाध्यक्ष. दिवाकर नावडे राजुरा तालुका सहसचिव. कृष्णा तू जाधव सोशल मीडिया प्रभारी राजुरा, उमेश चव्हाण संतोष चव्हाण, रोहित दुरुटकर, प्रशांत दुर्गे, आकाश शेंडे, आशिष किट्टे, इंद्रजित कश्याप, अजय गुरनुले, राजेश हिवरे तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सर्व सदस्य व छत्रपती शिवाजी अकॅडमी राजुरा चे प्रशिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत