Breaking News

कार्तिकी पौर्णिमा निमित्त गणेशपुर येथे विविध कार्यक्रम संपन्न

 जनसेवक पवन मस्के यांची उपस्थितीती 

महा घडामोडी न्युज नेटवर्क, भंडारा : हिंदु धर्मात कार्तिक पौर्णिमा या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने कार्तिकी पौर्णिमा निमित्त भंडारा तालुक्यातील गणेशपुर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर आणि हनुमान मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपुर्ण गणेशपूर गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाला होता. 

कार्तिक पौर्णिमा निमित्त पहिल्या दिवशी विठ्ठल रुक्माई मंदिर आणि हनुमान मंदिर येथे टिपूर जाळण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. तर कार्तिक पौर्णिमाच्या दुसऱ्या दिवशी दहीकाला कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात घेण्यात आला. यात प्रामुख्याने गुरुदेव सेवा मंडळ गणेशपुर तसेच हनुमान मंदिर कमिटी गनेशपुर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर कमिटी गणेशपूर येथील मंडळी आणि प्रामुख्याने यावेळी जनसेवक पवन मस्के यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत