Breaking News

दगडाने ठेचून वृद्ध इसमाचा खून,अज्ञात आरोपीचा शोध सुरू

 शेगाव पोलिसांची कारवाई 

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : वरोरा तालुक्यातील शेगाव बुर्ज येथून जवळच असलेल्या चारगाव बुर्ज येथे 11 नोव्हेंबर ला सकाळच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह चारगाव ते वायगाव मार्गावरील झुडपाआड आढळला.घटनेची माहिती स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन च्या ठाणेदार अविनाश मेश्राम यांना दिली असता पोलीस पथक।घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांना दिली असता सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास केला असता अज्ञात मृतक याची ओळख पटली असून सदाशिव महाकुडकर रा.भेंडाला अंदाजे वय 55 वर्ष आहे.

   मृतक सदाशिव हा वायगाव भोयर येथे एका संबंधित नातेवाईकाच्या।घरी गेला होता .दरम्यान माझी कोर्ट कचेरीची तारीख आहे असे सांगून तो घराबाहेर निघालाअसल्याचे नागरिकांनी सांगितले.10 नोव्हेंबर च्या रात्री या मृतक।इसमावर चारगाव ते वायगाव मार्गावर हल्ला करून दगडाने ठेचून जागीच ठार केले.सदर घटना 11 नोव्हेंबर ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.मृतक सदाशिवला दारूचे व्यसन सुद्धा होते असे बोलल्या जात आहे.त्याच्याजवळ पाचशे रुपयांच्या नोटांचा बंडल होता अशी चर्चा होती.त्यामुळे पैशासाठी त्याचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.मृतकाच्या डोक्यावर व नरडीजवळ दगडाने वार करून जागीच ठार केले.

विशेष म्हणजे हा खून की घातपात आहे याचा अधिक उलगडा करण्यासाठी श्वान पथक बोलाविण्यात आले.परंतु आरोपीचा शोध लागला नव्हता.तेव्हा घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार अविनाश मेश्राम याच्या नेतृत्वात पीएसआय प्रवीण जाधव,पीएसआय महादेव सरोदे,पोलीस कर्मचारी विठ्ठल वैद्य,राकेश तुराणकर,मदन येरणे, पुरुषोत्तम दातारकर आदि करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत