दौंड तालुकास्तरिय कराटे स्पर्धा कै. एकनाथ सिताराम दिवेकर ग्राम शिक्षण संस्था वरवंड येथे संपन्न
दौंड तालुकास्तरिय कराटे स्पर्धा कै. एकनाथ सिताराम दिवेकर ग्राम शिक्षण संस्था वरवंड येथे संपन्न
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पुणे : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दौंड तालुकास्तरिय कराटे स्पर्धा कै. एकनाथ सिताराम दिवेकर ग्राम शिक्षण संस्था वरवंड येथे घेण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये श्री सुरेश जाधव, श्री ऊध्दव गायकवाड,राजेंद्र जाधव, सतिश जाधव, गणेश जाधव श्री अवधुत चिलवंत सर यांनी रेफ्री व जडेजमेंट चे काम महत्वपूर्ण पार पाडले. स्पर्धेमध्ये श्री सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कडेठाण येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
वेदांत धावडे ( प्रथम )
ऐश्वर्या दिवेकर ( प्रथम )
श्रेया जगताप ( प्रथम )
समिक्षा यादव ( प्रथम )
रोशनी रणधीर ( दुसरा)
शिवम जाधव ( तिसरा )
जान्हवी यादव ( तिसरा )
सुजित दिवेकर( तिसरा )
प्रथमेश लगड ( तिसरा )
समृद्धी यादव ( तिसरा )
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा वरिल सर्व माहिती श्री सुरेश जाधव यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत