Breaking News

प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स बस पलटून दोन जागीच ठार तर सतरा जण गंभीर जखमी

 मनाला हदरणारी चित्त थरारक घटना,

प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स बस पलटून दोन जागीच ठार तर सतरा जण गंभीर जखमी,

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, सुभाष अलगमकर, राजुरा : प्रवाश्यांना घेऊन हैद्राबादकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस CG 09 JN 1933, विरुर (स्टे) -धानोरा मार्गावर पलटली असून या घटनेत दोन जण जागीच मृत्युमुखी पडले तर सतरा जण गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार ही घटना शुक्रवार च्या रात्री 2.30 वाजताच्या सुमारास झाल्याचे कळले.

सदर घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथून सुमारे ३ किमी अंतरावर घडली असून या ट्रॅव्हल्समध्ये छत्तीसगड राज्यातून बेमेत्रा जिल्ह्यातील ता . नावागळ येथून हैदराबाद ला 37 मजूर घेऊन जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हि घटना घडल्याचे समजते.

या घटनेची माहिती विरूर पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्यांना यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले व त्यांना उपचाराकरिता रुग्णांची स्थिती पाहून किरकोळ जखमीना उपचाराकरिता शासकीय रुग्णालय विरूर (स्टे) तर गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालय राजूरा तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत