नांदा येथे संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व संत गाडगेबाबा स्मृतीदिन महोत्सव
नांदा येथे संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व संत गाडगेबाबा स्मृतीदिन महोत्सव.
विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन..
दिनांक 20,21,22 रोज शुक्रवार, शनिवार, रविवार भरगच्च असा कार्यक्रम..
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नांदा : वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा कायम राखत या वर्षी देखील नांदा येथे संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व संत गाडगेबाबा स्मृतीदिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
नांदा येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी व वैराग्यमुर्ती गाडगेबाबा यांचा ६६ वा स्मृतीदिना निमित्य कार्यक्रम दि. २०, २१ व २२ जानेवारी २०२३ रोज शुक्रवार, शनिवार व रविवारला महोत्सवाचे आयोजन गुरुदेव सेवा भजन मंडळ व समस्त गावकरी नांदा यांनी केले आहे.
"भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा" तसेच युवा किर्तनकार आकाश ताविडे, अमर ताविडे महाराज यांचा किर्तनाचा व सोबतच पालखी सोहळाचे नियोजन केले आहे तरी या भरगच्च अशा कार्यक्रमाचा परिसरातील जनतेने अस्वाद घ्यावा असे आव्हान गुरूदेव सेवा भजन मंडळाचा सदस्यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत