आठवड्यातुन तिनदाच उघडतात ग्रामपंचायतीची दारे
आठवड्यातुन तिनदाच उघडतात ग्रामपंचायतीची दारे
दुर्गम जिवती तालुक्यातील वास्तव
ग्रामसेवकांच्या अप-डाऊनमुळे विकासाला खिळ
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : आदिवासीबहुल दुर्गम मागास अशी जिवती तालुक्याची सर्वत्र ओळख मात्र इथे येणारा कर्मचारी व अधिकारी पनिशमेंटच्या नावाखाली जिवती तालुका मिळाला असल्याचे सांगुन कार्यालयाला नावापुरतीच हजेरी लावून एखादया राजकिय पुढाऱ्याला हाताशी धरून जिल्हयाच्या ठिकाणावरुनच सुत्रे हलवित असल्याचे जिवती तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत दिसुन येत आहे. ग्रामसेवक सोमवार, आठवडी बाजाराचा दिवस किंवा स्वतःच्या मर्जीतला एखादा दिवस असे नेमलेल्या दिवसीच कार्यालय उघडत असल्याचे निदर्शनात येत आहे.
शासनाच्या नियमानुसार शासकिय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहुन सेवा देणे अपेक्षीत असतांना मात्र जिवती तालुक्यातील ग्रामसेवक शासनाच्या नियमांचे पालन करतांना दिसत नाहीत. कधी पंचायत समिती तर कधी जिल्हा परिषदेत काम असल्याच्या सबबीखाली कार्यालयाला दांडी मारने नित्याचेच झाले आहे.
अनेक ग्रामसेवक तालुक्याबाहेरुन म्हणजेच गडचांदूर, राजुरा, चंद्रपुर येथुन ये - जा करतात त्यामुळे अपेक्षेप्रमाणे कामे न होता बरेचदा ती कागदोपत्रीच होतात त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र दिसुन येते. ग्रामस्थांना विविध दाखल्यांची गरज असते त्याची पुर्तता ग्रामसेवक करतात,शेतकरी व विद्यार्थ्यांना ग्रामसेवक गावात राहत नसल्यामुळे शहरात राहत असलेल्या ग्रामसेवकाचे घर शोधत कागदपत्रे मिळवावी लागतात त्यात अनेकांना वेळेचा अपव्यय व आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागते. ग्रामिण भागाचा विकास व्हावा या उदात्त हेतुने शासन कोट्यवधी रुपये खर्च करते परंतु प्रत्यक्षात कामे करतांना काही कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत नसल्याच्या चर्चा ग्रामिण भागात ऐकायला मिळत आहेत.
आधिच दुर्गम आणि मागास अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्याला लागलेला ' पनिशमेंट ' नावाचा शिक्का हे या तालुक्याला लागलेला शाप समजावा लागेल. ग्रामसेकावर ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नियंत्रण असते तेच अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामसेवकाचे चांगलेच फावत आहे व त्यांना जाब विचारणार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
" ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहुन सेवा देणे बंधनकारक असताना तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक या नियमाकडे पाठ फिरवतांना दिसत आहेत अशा ग्रामसेवकांवर वरिष्ठांनी कारवाई करण्याची गरज आहे. " : आरिफ शेख, अध्यक्ष जनसत्याग्रह समिती जिवती.
ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाहीत त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ग्रामिण भागाची 'ऍलर्जी ' झाल्यासारखे गाव खेड्यापासुन दुर राहतात ज्यांच्या खांद्यांवर ग्रामिण विकासाची धुरा आहे तेच शासनाचे नोकरदार ग्रामिण भागाकडे पाठ फिरवत असल्याने ग्रामिण विकासात खिळ बसली आहे, ग्रामसेवकांचा जास्त वेळ जाण्यायेण्यातच खर्च होत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली जात आहेत असा आरोप व ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहुन सेवा द्यावी अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत